इराणच्या पत्रकाराला फाशी ; सरकारविरोधात लिखाण केल्याची शिक्षा

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

General जूनमध्ये इराणमधील कोर्टाने “पृथ्वीवरील भ्रष्टाचार” या आरोपाखाली दोषी ठरलेल्या 'रूहुल्ला जम' या ४७ वर्षीय पत्रकाराला आज पहाटे ५ वाजता फाशी देण्यात आली.

तेहरान : जूनमध्ये इराणमधील कोर्टाने “पृथ्वीवरील भ्रष्टाचार” या आरोपाखाली दोषी ठरलेल्या 'रूहुल्ला जम' या ४७ वर्षीय पत्रकाराला आज पहाटे ५ वाजता फाशी देण्यात आली. या पत्रकाराच्या लिखाणामुळे २०१७ साली इराणमध्ये अर्थव्यवस्थेविरोधात झालेल्या आंदोलनाला पाठबळ मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्यावर हेरगिरी करून इराणचे सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्याचादेखील आरोप आहे. 

जमची वेबसाइट 'आमदन्यूज' आणि लोकप्रिय संदेशन अ‍ॅप टेलीग्रामवर त्याने तयार केलेल्या वाहिनीने इराणच्या शिया धर्मगुरूसत्ताक राज्यपद्धतीला थेट आव्हान देणारी माहिती प्रसारित केली होती. यामध्ये होणाऱ्या आंदोलनाचे ठिकाण आणि वेळ प्रसारित करण्यात आली होती. रूहुल्ला जम हा शिया धर्मगुरू मोहम्मद अली झॅम यांचा मुलगा होता, जे १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला सरकारसाठी काम करत होते. झॅमच्या वडिलांनी जून २०१७ मध्ये माध्यमांद्वारे एक पत्र प्रकाशित केले होते ज्यामध्ये त्यांना, "मी माझ्या मुलाच्या आदमन्यूजच्या वृत्तांत आणि त्याच्या टेलिग्राम वाहिनीवरील संदेशाला पठिंबा देणार नाही", असे म्हटले होते.

संबंधित बातम्या