अमेरिकन अधिकाऱ्याने दिली अफगाणिस्तानात युद्ध हरल्याची कबुली

अमेरिकेचे सर्वोच्च जनरल मार्क मिल्ली (General Mark Milley) यांनी बुधवारी कबूल केले की अमेरिकेने अफगाणिस्तानमधील 20 वर्षांचे युद्ध हारले आहे.
अमेरिकन अधिकाऱ्याने दिली अफगाणिस्तानात युद्ध हरल्याची कबुली
General Mark Milley: We lost our 20 years war in Afghanistan against TalibanDainik Gomantak

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यापासून अमेरिकेने (USA)अफगाणिस्तान युद्ध हरल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता एका मोठ्या पदावर असलेल्या अमेरिकन जनरलनेही हेच सांगितले आहे. आणि त्याच्या याच विधानाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे सर्वोच्च जनरल मार्क मिल्ली (General Mark Milley) यांनी बुधवारी कबूल केले की अमेरिकेने अफगाणिस्तानमधील 20 वर्षांचे युद्ध हारले आहे. एका अमेरिकन जनरलने पराभव स्वीकारणे ही मोठी गोष्ट आहे. यामुळे अतिरेकी संघटना (Terrorist Organization) तालिबानची हिम्मत आणखी वाढू शकते.(General Mark Milley: We lost our 20 years war in Afghanistan against Taliban)

अमेरिकेच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल मार्क मिल्ली यांनी सांगितले की, "आपल्या सर्वांना हे स्पष्ट आहे की अफगाणिस्तानमधील युद्ध काबुलमध्ये तालिबानच्या सत्तेवर येण्याच्या आमच्या अटींवर संपलेले नाही. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघार आणि सर्वांना राजधानी काबूलमधून बाहेर काढण्याबाबत मिल्लीने समितीला सांगितले, "युद्ध हे धोरणात्मक अपयश होते. ते 20 दिवस किंवा 20 महिन्यांत हरवले नाही. ते म्हणाले,अफगाणिस्तान युद्ध ही सामरिक निर्णयांची संपूर्ण मालिका आहे, जी खूप मागे जाऊन पाहावे लागेल."

जनरल मार्क मिल्ली म्हणाले, 'जेव्हा जेव्हा आपल्याकडे युद्धासारखी एखादी घटना घडते, तेव्हा हीच परिस्थिती असते. आम्ही अल-कायदा विरुद्ध अमेरिकेचे रक्षण करण्याचे आमचे धोरणात्मक कार्य पूर्ण केले आहे, परंतु अर्थातच अंतिम परिणाम आम्हाला पाहिजे त्यापेक्षा खूप वेगळा आहे. आणि आम्ही हरलो. म्हणून जेव्हा जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा त्यात अनेक घटक असतात. आणि आपल्याला तेच घटक शोधावे लागतील . यातून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे.' अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेच्या पराभवासाठी मिल्लीने अनेक घटकांना जबाबदार धरले आहे.

General Mark Milley: We lost our 20 years war in Afghanistan against Taliban
तिबेट मुद्यावरून UN ने चीनला सुनावले खडेबोल

अमेरिकेच्या सर्वोच्च जनरलने सांगितले की 2001 मध्ये अफगाणिस्तानवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर लगेचटोरा बोरा येथे अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेनला पकडण्याची किंवा मारण्याची संधी गमावणे हे देखील पराभवाचे कारण आहे. ते म्हणाले की 2003 मध्ये इराकमध्ये युद्ध झाले होते, ज्यामुळे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून तेथे पाठवण्यात आले होते. यामुळे अफगाणिस्तान युद्धातही पराभव झाला. याशिवाय, तालिबानला सुरक्षित आश्रयस्थान असूनही योग्य प्रकारे सामोरे जाण्यात पाकिस्तानचे अपयश आणि काही वर्षांपूर्वी युद्धग्रस्त देशातून सल्लागारांची हकालपट्टी केल्यामुळेही पराभव झाला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com