कोरोना लसीकरण पूर्ण करणारा 'हा' ठरला जगातील पहिला देश

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मार्च 2021

जिब्राल्टर देशातील सर्व नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे.

(Gibraltar became the first country in the world to complete the corona vaccination) जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र या कोरोना संकटाच्या काळामध्ये 'जिब्राल्टर' नावाच्या छोट्याशा देशाने एक नवी कमाल करुन दाखवली आहे. आपल्या देशातील सर्व नागरीकांना कोरोनाची लस देण्याचा पराक्रम या देशाने करुन दाखवला आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी जिब्राल्टर देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत, असं हॅनकॉक यांनी सांगितले.

जिब्राल्टर या देशाची लोकसंख्या 34 हजाराच्या आसपास आहे. या देशात कोरोनाचे 4263 रुग्ण आढळून आले होते. देशात 94 लोकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. हॅनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या संदर्भातील माहिती देताना, ''मला सांगताना खूप आनंद होत आहे की, काल जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला ज्याने आपल्या सर्व नागरीकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे,'' असं त्यांनी सांगितले. कोरोना सारख्या संकटाच्या काळात जिब्राल्टच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि साहसाचं मी कौतुक करतो, असं म्हणत हॅनकॉक यांनी जिब्राल्टरच्या नागरिकांचे कौतुक केलं. (Gibraltar became the first country in the world to complete the corona vaccination)

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड जे ऑस्टिन भारत दौर्‍यावर; या विषयांवर होणार खास...

हॅनकॉक पुढे म्हणाले, ''ब्रिटिश देशांच्या समूहामध्ये असणाऱ्या या देशातील लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवण्यात नागरिकांनी मोलाचं सहकार्य केलं हे कौतुकास्पद आहे''. जिब्राल्टरचे प्रमुख फॅबियन पिकार्डो यांनी लसीकरणासाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांचे आभार मानले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी पीपीई किट, कोरोनाची लस आणि त्यासाठी लागणारी आवश्यक ती सामग्री तसेच आर्थिक सहाय्य ब्रिटनने केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो असं पिकार्डो यांनी म्हटलं. जिब्राल्टरमध्ये सध्या 26 रुग्ण असून त्यापैकी 10 जण हे परदेशी आहेत. जिब्राल्टर हा स्वतंत्र देश आहे. मात्र युनायटेड किंग्डमचे नियंत्रण असल्याने येथील लसीकरणाला संपूर्णत:हा मदत ब्रिटनने केली आहे. जिब्राल्टर देशामध्ये लसीकरण मोहीम यश्स्वीपणे पार पडल्यामुळे इतर देशांचाही आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. 

 

संबंधित बातम्या