British Woman: बॉयफ्रेंड मिळाला नाही, गर्लफ्रेंडनं थेट ब्लँकेटशी केलं लगीन; Video पाहून...!

British Woman Married With A Blanket: एका ब्रिटीश महिलेने तिचे कुटुंबीय, मित्र आणि प्रियकर यांच्यासमोर ब्लँकेटशी लग्न केल्याचा खुलासा केला आहे.
British Woman
British WomanDainik Gomantak

British Woman Married With A Blanket: एका ब्रिटीश महिलेने तिचे कुटुंबीय, मित्र आणि प्रियकर यांच्यासमोर ब्लँकेटशी लग्न केल्याचा खुलासा केला आहे. महिलेने सांगितले की, हे पहिल्या नजरेतील प्रेम होते. पास्कल सेलिक (Pascal Celik) असे या महिलेचे नाव आहे.

तिच्या मते, हे माझ्या आयुष्यातील खास नाते आहे. पहिल्या नजरेतच मी प्रेमात पडले. ब्लॅंकेटसोबतच्या तिच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून नेटिझन्संना धक्काच बसला. पास्कल सेलिकने 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी खुल्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. पहिल्या नजरेतच प्रेमात पडल्यानंतर, ती तिच्या ब्लँकेटला तिचा विश्वासू साथीदार मानू लागली.

गर्लफ्रेंडने ब्लॅंकेटशी लग्न केले

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, तिने इंग्लंडमधील (England) एक्सेटरमध्ये ब्लँकेटशी लग्न केले. विशेष म्हणजे, तिने स्व:ताच्या प्रियकर आणि कुटुंबीयांना आमंत्रित केले. एका टीव्ही शोमध्ये पास्कलने सांगितले की, अनेक ब्लँकेट असूनही, फक्त हीच ब्लँकेट मला सर्वात जास्त आराम आणि उबदारपणा देते.

British Woman
Viral Video: समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी वाचविले; पाहा व्हिडिओ

पास्कलच्या मते, ब्लँकेट माझ्या मित्रासारखे आहे. सुख-दुःखात ते माझ्यासोबत असते. तिच्या प्रियकराबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पास्कलने उत्तर दिले की, मी ब्लॅंकेटशी लग्न (Marriage) का केले हे त्याला समजले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com