ग्लोबल कोरोना अपडेट : आत्तापर्यंत कोरोना झालेल्यांची संख्या ९ कोटींच्या पार

वृत्तसंस्था
रविवार, 10 जानेवारी 2021

अत्यल्प काळात संपूर्ण जगात पसरणाऱ्या कोरोनाने 9 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 9 कोटी 11 हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

ग्लोबल कोरोना अपडेट : अत्यल्प काळात संपूर्ण जगात पसरणाऱ्या कोरोनाने 9 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 9 कोटी 11 हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जगभरात कोरोना झालेल्यांची विक्रमी नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी चिंतेची बाब बनली आहे.

गेल्या 24 तासांत जगभरात 6.79 लाखाहून अधिक लोकांना कोरोना लागण झाली आहे. तर, 11 हजाराहून अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. आता जगभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या 9 कोटींपेक्षा जास्त आहे. आत्तापर्यंत कोरोना विषाणूमुळे 19 लाख 33 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 6 कोटी 44 लाख 24 हजारांहून अधिक लोक या आजारातून बरे झाले आहेत. एकूण 9 कोटींपैकी दोन कोटी 36 लाख 53 हजार लोक अजूनही कोरोनावर उपचार घेत आहेत.
 

संबंधित बातम्या