Global Peace Index: आइसलँड सर्वात शांत देश, भारतात शांतता अन् बंधुता वाढली

आइसलँड (Iceland) हा जगातील सर्वात शांत देश आहे, तर अफगाणिस्तान हा सर्वाधिक अशांत देश आहे.
Global Peace Index: आइसलँड सर्वात शांत देश, भारतात शांतता अन् बंधुता वाढली
IcelandDainik Gomantak

Global Peace Index: ग्लोबल पीस इंडेक्स 2022 (GPI) अहवालात, जिथे भारतातील हिंसाचाराबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे, तिथे भारतासाठी काही दिलासा देणारी आकडेवारीही जारी करण्यात आली आहे. गेल्या एका वर्षात भारतात शांतता आणि बंधुता वाढीस लागला आहे, असे जीपीआय अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे अहवाल निर्मात्यांनी भारताचे मानांकन गतवर्षीच्या 138 वरुन 3 अंकांनी आणि 135 पर्यंत वाढवले​आहे.

दरम्यान, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष, सामाजिक सुरक्षासह दोन डझन पॅरामीटर्सच्या आधारे मूल्यांकन केल्यानंतर हा निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे.

Iceland
रशिया युक्रेन युद्धात युक्रेनच्या 10 हजार सैनिकांचा मृत्यू

अहवालानुसार, आइसलँड (Iceland) हा जगातील सर्वात शांत देश आहे, तर अफगाणिस्तान हा सर्वाधिक अशांत देश आहे. या निर्देशांकात 163 देशांची क्रमवारी देण्यात आली आहे. यावेळच्या अहवालातही अफगाणिस्तान (Afghanistan) शेवटच्या म्हणजे 163 व्या क्रमांकावर आहे. गतवर्षीही त्यांचा हाच क्रमांक होता.

त्याच वेळी, येमेन 162 व्या क्रमांकावर आहे. गतवर्षीही येमेन याच क्रमांकावर होते. सीरिया 161 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीही सीरियाचा (Syria) हाच क्रमांक होता. दुसरीकडे, रशियाचे मानांकन पाच अंकानी कमी झाले असून 160 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. गेल्या वर्षी रशिया 155 व्या क्रमांकावर होता.

Iceland
भारताने रशियापुढे ठेवला रुपयात तेल-शस्त्रे खरेदीचा प्रस्ताव, ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता

दुसरीकडे, या निर्देशांकात भारताचा (India) क्रमांक 135 वा आहे. शांततेच्या बाबतीत भारताला निम्न श्रेणीत ठेवण्यात आले आहे. भारताच्या शेजारी देशांबद्दल बोलायचे झाल्यास, या अहवालात पाकिस्तानला (Pakistan) 147 वा क्रमांक देण्यात आला आहे. त्याचबरोबर नेपाळ 73 व्या, श्रीलंका 90 व्या आणि बांगलादेश 96 व्या क्रमांकावर आहे. यावेळी अहवालातील सर्वात शांत देशांच्या श्रेणीत युरोपातील चार देशांचा समावेश टॉप-10 मध्ये करण्यात आला आहे.

त्याचबरोबर पहिल्या क्रमांकावर आइसलँड (Iceland), दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड, तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंड, चौथ्या क्रमांकावर डेन्मार्क, पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रिया, सहाव्या क्रमांकावर पोर्तुगाल, सातव्या क्रमांकावर स्लोव्हेनिया, आठव्या क्रमांकावर चेक प्रजासत्ताक, आठव्या क्रमांकावर सिंगापूर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com