गुगलमध्ये आता चार दिवसांचा आठवडा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येऊ नये, त्यांना मानसिक शांतता मिळून कुटुंबाबरोबर वेळ व्यतित करता यावा, यासाठी आठवड्यातून शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सुटी जाहीर केली आहे.

माउंटन व्ह्यू (अमेरिका): आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना मार्च २०२१ पर्यंत घरून काम करण्याची मुभा दिल्यानंतर गुगल कंपनीने आता चार दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. 

कोरोना संसर्गाच्या काळात सुरक्षिततेची जबाबदारी सामूहिक असल्याचे सांगत कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुटी दिली आहे. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येऊ नये, त्यांना मानसिक शांतता मिळून कुटुंबाबरोबर वेळ व्यतित करता यावा, यासाठी आठवड्यातून शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सुटी जाहीर केली आहे. ही सुटी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनाही दिली जाणार आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या