
Google co-founder Sergey Brin divorces wife over alleged affair with Elon Musk:
गुगलचे सहसंस्थापक सर्जे ब्रिन यांचा घटस्फोट झाला आहे. दरम्यान, एलन मस्क आणि सर्गेई ब्रिन यांच्या पत्नीचे अफेअर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणावर आता मस्क आणि निकोल शानाहान यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांचे फोटो दिसू लागल्यावर लोकांना संशय आला होता.
न्यायालयाची कागदपत्रे समोर आल्यानंतर या दोघांमधील घटस्फोटाची याचिका २६ मे रोजी दाखल झाल्याचे समोर आले आहे. मात्र त्याची माहिती प्रसारमाध्यमांनाही नसल्याने लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत.
सेर्गे ब्रिन आणि निकोल शानाहान यांना चार वर्षांची मुलगीही आहे. दोघांमध्ये याबाबत कायदेशीर लढाई सुरू आहे. २०१५ मध्ये दोघांमधील जवळीक वाढली. ब्रिननेही याच वर्षी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. यानंतर दोघांनी 2018 मध्ये लग्न केले होते.
घटस्फोटाच्या एक महिना आधी शानाहान आणि मस्क एकत्र दिसले होते. त्यामुळेच त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली. मात्र, मस्क आणि शानाहन या दोघांनी ट्विटरवर या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
25 मे 2022 रोजी स्पष्टीकरण देताना, मस्कने लिहिले होते की सर्गेई आणि मी काल रात्री एकत्र पार्टीत होतो, आम्ही फक्त मित्र आहोत. आम्ही 3 वर्षात फक्त 2 वेळा भेटलो, त्या वेळी देखील आमच्या आजूबाजूला कोणी ना कोणी होते.
एलन आणि मी मिळून कोणतीही चूक केलेली नाही, असेही निकोल शानाहानने स्पष्ट केले. तिने सांगितले की आमच्यात कोणतेही प्रेमसंबंध नाहीत.
ब्लूमबर्ग अब्जाधीश यादीनुसार, 50 वर्षीय Google सह-संस्थापक $118 अब्ज संपत्तीसह जगातील नववे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
निकोल शानहानच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, ती एक कॅलिफोर्नियामध्ये वकील आणि Bia-Eco फाउंडेशनची संस्थापक आणि अध्यक्ष आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.