सेवा बंद पडण्याचे कारण गूगलने जाहीर केलेले नाही 

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

सेवा बंद पडण्याचे कारण मात्र गूगलने जाहीर केलेले नाही. 

नवी दिल्ली:  जीमेल आणि गूगलच्या सर्व सेवा सोमवारी संध्याकाळी काही काळासाठी खंडित झाल्या होत्या. जगभरातील बहुतांश देशातील यूजरना काही काळासाठी गूगलच्या सेवांचा उपयोग त्याकाळात करता आला नाही. 

गूगल वर्कस्पेस या ट्विटर हँडलवरुन ट्विट करून सगळ्या सेवा पूर्ववत झाल्याची माहिती देण्यात आली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या सेवा बंद पडल्या होत्या, त्या सव्वा सहाच्या सुमारास पूर्ववत झाल्याचे गूगलने स्पष्ट केले.

सेवा बंद पडण्याचे कारण मात्र गूगलने जाहीर केलेले नाही. 
अनेक यूजर्सना गूगल या सर्च इंजिनवर माहिती शोधताना करताना अडचणी येत होत्या. तसेच यूट्युबवरही `एरर` संदेश येत होता आणि जीमेलवरही असाच संदेश दाखविला जात होता. असुविधेबद्दल खेद आहे, लवकरच आम्ही पूर्ववत सेवा देऊ या आशयाचा मेसेज युट्यूब, जीमेल आणि गूगलवर येत होता. काही ठिकाणी गूगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु होते. 
 

संबंधित बातम्या