ग्रेट ब्रिटन 2021 मध्ये होणार कोरोनामुक्त! टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी दिलं कारण!

Great Britain to be Corona Free in 2021 The reason given by the President of the Task Force
Great Britain to be Corona Free in 2021 The reason given by the President of the Task Force

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाचा वाढता फैलाव आटोक्यात आणायचा कसा? याचं विंवचनेत जगभरातील सर्व देश आहेत. मात्र ब्रिटनमध्ये (Briten) मात्र चित्र वेगळं आहे. ‘’येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ब्रिटन कोरोनामुक्त झालेला असेल, असा दावा ब्रिटनच्या लसीकरण टास्क फोर्सचे मावळते अध्यक्ष क्लाइव्ह डिक्स यांनी केला आहे.’’ ‘ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनाचा प्रसार हा थांबलेला असेल,’ असं देखील त्यांनी सांगितलं आहे. ब्रिटनमध्ये लसीकरणात मॉडर्नाबरोबर(Moderna) फायझर (Pfizer) आणि काही प्रमाणात ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या कोविशील्ड(Covishield) लसीचे डोस दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून करण्यात येत असलेला दावा हा जगासाठी दिलासा देणारा ठरत आहे. (Great Britain to be Corona Free in 2021 The reason given by the President of the Task Force)

जगभरात कोरोनाचा होत असलेला प्रसार अद्याप कमी झालेला नसताना ब्रिटनेने अशाप्रकारे दावा करणं ही महत्त्वाची बाब ठरली आहे. क्लाईव्ह डिक्स यांनी सांगितल्यानुसार, ब्रिटनमध्ये आतापर्यंत 5 कोटी 10 लाख नागरिकांना लसीकरण पूर्ण झालं आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत ब्रिटनमधल्या प्रत्येक नागरिकाला कमीत कमी एक तरी लसीचा डोस दिलेला असेल. त्यामुळे तोपर्यंत ब्रिटनने आपल्या सगळ्या नागरिकांना सध्या माहिती असलेल्या कोरोनाच्या सर्व प्रकारांपासून माहिती असणार. देशातल्या तरुण लोकसंख्येपैकी किमान अर्ध्या लोकसंख्येला लसीकरण करुन ब्रिटन या गटासाठी सर्वात वेगाने लसीकरण करणारा जगातील दुसरा देश ठरला आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने जगभरात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतात (India) देखील लसीकरणाची मोहीम सुरु आहे. मात्र लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण मोहीमेत अनेक अडचणी येत आहेत. केंद्र सरकारने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार 17.35 कोटींहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवण्यात आले आहेत. मात्र भारताच्या लोकसंख्येच्या मानाने ही संख्या  सुमारे 15 टक्क्यांच्या जवळपास असल्याने हा आकडा मोठा मानला जात आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोना लसीकरणपेक्षाही जनतेनं कोरोना नियमाचं पालन करणं अधिक महत्त्वाचं असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com