Ambergris: मच्छीमारांना सापडले तरंगते सोने; व्यापाऱ्यांनी दिली 25 कोटींची ऑफर

whale vomit or ambergris
whale vomit or ambergris

येमेनमधील 35 मच्छीमारांचे(fishermen) जीवन बदलून गेले आहे. समुद्रात तरंगणारे सोने सापडले आहे. फेब्रुवारी महिन्यात या मच्छीमारांच्या गटाला अशी माहिती मिळाली होती की स्पर्म वेल मासा अडेनच्या खाडीमध्ये तरंगताना आढळला. यानंतर त्याच्या लक्षात आले की, त्यांना अशी अमुल्य वस्तू मिळू शकेल ज्याची किंमत लाखोंची असेल. ती गोष्ट म्हणजे माशाची उलटी(whale vomit ). जर हे ऐकून तुम्हाला अजब वाटत असेल तर त्याचे मूल्य ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे. या उलटीचे वजन एक किलो असून त्याची किंमत 35 हजार पौंडाहून अधिक म्हणजे 36 लाखांपेक्षाही जास्त आहे.(A group of 35 fishermen found whale vomit or ambergris worth around)

अल-खैसा येथील या मच्छीमारांना वेलचा मृतदेह सापडला जेव्हा त्यांनी त्या माशाला कापून बघितले. तेव्हा त्या माशाच्या पोटात 127 किलोची एक दुर्मीळ वस्तू सापडली. यासाठी त्याला 11 लाख पौंड म्हणजे 11 कोटींपेक्षा जास्त रुपये देण्यात आले. वेल मधून येणाऱ्या वासामुळे या मच्छीमारांना असे वाटले की, कदाचित त्यात Ambergris सापडेल. पण त्यांचा अंदाज चूकला आणि त्यांना लॉटरीच लागली असं म्हणायला हरकत नाही. या लोकांनी मिळालेले पैसे केवळ आपापसात वाटून घेतले नाहीत तर ते गावातील इतर गरजू लोकांनाही दिले.

युद्धग्रस्त येमेनमधील या लोकांचे जीवन बदलू लागले आहे. चांगली घरे आणि वाहनांपासून मूलभूत गरजा पर्यंत आता त्यांना सहज काही गोष्टी उपलब्ध होणार अशी आशा आहे. अंबरग्रीस अत्यंत मौल्यवान मानले जाते. जगातील बर्‍याच भागातही त्याची तस्करी केली जाते. भारतातही एक किलो वेल वॉमिटची किंमत कोटींमध्ये आहे. अंबरग्रीस, मेणा सारखा ज्वलनशील पदार्थ आहे. पाण्याखाली, वेल मासे अशा पुष्कळशा जीवांना खातात ज्यांची चोची आणि शेल्स धारदार असतात. अंबरग्रीस त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे जेणेकरून त्यांना खाताना वेलच्या आतील बाजूस दुखापत होणार नाही.

याचा उपयोग परफ्यूम इंडस्ट्री मध्ये केला जातो. त्यामध्ये असलेल्या अल्कोहोलचा वापर महागड्या ब्रँड्सचे अत्तर बनवण्यासाठी केला जातो. त्याच्या मदतीने, परफ्यूमचा वास बराच काळ टिकवून ठेवता येतो. यामुळे, त्याची किंमत खूप जास्त आहे. अगदी वैज्ञानिकांनीसुद्धा त्याला तरंगणारे सोने म्हटलं आहे. थायलंडमध्ये ज्या मच्छीमारांना हा सोन्याचा तुकडा सापडला त्याला व्यापाऱ्यांनी 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com