Gun Firing In USA: अमेरिकेत एकाच दिवसांत दोन घटना, बेछुट गोळीबारात नऊ जण ठार

Gun Violance In USA: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत सातत्यानं गोळीबाराच्या घटाना समोर येत आहेत.
Gun Firing In USA
Gun Firing In USADainik Gomantak

जगातील शक्तीशाली देश असलेला अमेरिकेसाठी आता तेथील बंदूक संस्कृती डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अमेरिकेतून गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत.

कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी म्हणजेच 23 जानेवारीला झालेल्या गोळीबारात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेतील संशयिताला ताब्यात घेतले आहे. सॅन मेंटो येथील पोलीस मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस 30 मैल अंतरावर हाफ मून बेजवळ एका महामार्गावर गोळीबाराची घटना घडली होती.

सॅन मेंटो पोलिसांनी सांगितलं की, अमेरिकेत गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. अमेरिकेतील आयोवा येथील डेस मोयनेस शहरातील एका शाळेत सोमवारी झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी ठार झाले आहेत, तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. डेस मोयनेस पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिक्षकाची प्रकृतीही चिंताजनक आहे.

Gun Firing In USA
Pakistan Economy: अरे बापरे ! 'कंगाल' पाकिस्तानात ट्रेनचे भाडे तब्बल 10,000 रुपये, रेल्वे प्रवास महागला

कॅलिफोर्नियामध्ये बेछूट गोळीबार

कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांतील ही तिसरी घटना आहे. ज्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 22 जानेवारी रोजी कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमधील मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता.

या गोळीबारात अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर बचावकार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कॅलिफोर्नियातील गोळीबारात मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेचा ध्वज एका दिवसासाठी खाली ठेवण्याचे आदेश दिले.

अमेरिकेतील सामूहिक गोळीबाऱ्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेतच नाही आहे. अमेरिकेतील कोणत्या ना कोणत्या शहरातून दररोज सामूहिक गोळीबार झाल्याची घटना समोर येते. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि गोळीबार हे समीकरण झाले आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच, 2022 मध्ये अमेरिकत गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटना हॉस्पिटल, पब, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहेत. अमेरिकेसाठी तेथील बंदूक संस्कृती ही दिवसागणिक मोठी समस्या होत चालली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशात शस्त्रास्त्रांबाबत कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: व्यक्त केलं आहे. 

  • बंदूक संस्कृती ठरतेय डोकेदुखी

अमेरिकेसाठी बंदूक संस्कृती ही मोठी समस्या बनली आहे. 2021 मध्ये जवळपास 49 हजार लोकांनी गोळीबारात आपला जीव गमावला आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. देशात लोकसंख्येपेक्षा जास्त शस्त्रं आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com