हाफिज सईद तुरुंगातून गुपचूप घरात

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

मुंबईवर २६-११ रोजी करण्यात आलेल्‍या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला तुरुंगातून गुपचूप घरामध्ये हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

नवी दिल्ली: मुंबईवर २६-११ रोजी करण्यात आलेल्‍या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला तुरुंगातून गुपचूप घरामध्ये हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालत असल्याचे त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने हाफिज सईदला काही दिवसांपूर्वी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे तो तुरुंगातच असायला हवा होता. मात्र त्याला तुरुंगातून काढून घरी हलविण्यात आले आहे. लाहोरमधील जोहर टाऊनमधल्या घरातून तो दहशतवादी कारवाया करत असल्याचे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांच्या हवाल्याने काही इंग्रजी माध्यमांनी दिले आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या