कैरिबियन देशातील तुरूंगात घडली सर्वात मोठी प्राणघातक घटना

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

कैरिबियन देशातील हैती येथिल जेल तोडून 400 हून अधिक कैदी पळून गेले. या दरम्यान झालेल्या हिंसाचारात 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही देशातील सर्वात मोठी आणि प्राणघातक घटना आहे.

कैरिबियन: कैरिबियन देशातील हैती येथिल जेल तोडून 400 हून अधिक कैदी पळून गेले. या दरम्यान झालेल्या हिंसाचारात 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही देशातील सर्वात मोठी आणि प्राणघातक घटना आहे. ठार झालेल्यांमध्ये शक्तिशाली गँगच्या प्रमुखाचा आणि तुरूंगातील संचालक यांचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी क्रोएक्स-डेस-बुचेट्स कारागृहातील राजधानी पोर्ट-ओ-प्रिन्सच्या हद्दीत घडली.

ही घटना टोळीचा नेता अर्नेल जोसेफला तुरूंगातून पळविण्याच्या उद्देशाने घडली आहे अशी शक्यता वर्तविली जात आहे. 2019 मध्ये अटक होईपर्यंत जोसेफ हैतीमध्ये बलात्कार, अपहरण आणि खुनाच्या आरोपाखाली गुन्हेगार म्हणून अटक होता. त्याच्या पायात जेलची साखळी होती आणि मोटरसायकलवर बसून त्याला नेण्यात आले. जोसेफच्या सुटकेच्या दुसर्‍याच दिवशी त्याला एका चेकपॉईंटवर स्पॉट केले गेले. पोलिस प्रवक्ता गॅरी देस्रोस म्हणाले की, "पोलिसांना बघून जोसेफने त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी संरक्षनार्थ केलेल्या गोळीबारमध्ये त्याचा मृत्यू झाला. या टोळीच्या नेत्याने राजधानी पोर्ट-ओ-प्रिन्समध्ये असलेल्या गँग डी एडिओ आणि इतर समुदायांवर राज्य करत होता." 

भारत - पाकिस्तान संघर्षविरामाच्या निर्णयाचे अमेरिकेकडून स्वागत 

जेल तोडल्याबद्दल अधिकाऱ्यांनी अद्याप फारशी माहिती दिली नाही. 60 कैद्यांना पुन्हा अटक करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. असे सांगण्यात आले आहे. राज्य सचिव फ्रँटझ एक्सेंटस म्हणाले की, "तुरूंग तोडण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी अनेक कमिशन तयार केल्या आहेत. ठार झालेल्यांमध्ये तुरूंगातील संचालकही आहेत, ज्यांचे नाव पॉल जोसेफ हेक्टर आहे."  गुरुवारी काही बंदूकधार्‍यांनी तुरूंगातील रक्षकांवर गोळ्या झाडल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शकांनी पाहिले, असे साक्षीदारांचे म्हणणे आहे. त्यानंतर कैदी तुरुंगातून पळून गेले. यापूर्वी 2014 मध्ये 899 पैकी 300 कैदी या कारागृहातून पळून गेले होते. प्रमूख व्यावसायिकाच्या प्रौढ मुलाचे अपहरण केल्यामुळे 2012 पासून तुरुंगात असलेला प्रख्यात व्यावसायिकाचा मुलगा क्लीफोर्ड ब्रँडला मुक्त करण्यासाठी ही घटना घडवून आणल्याचे काही जणांचे मत आहे. दोन दिवसांनंतर ब्रँडला डोमिनिकन रिपब्लिक सीमेजवळ पकडले गेले होते.

संबंधित बातम्या