इस्रायलवर हल्ला करणारा हमास कोण आहे?

israil.
israil.

गाझा पट्टीवर(Gaza Strip) नियंत्रण ठेवणाऱ्या हमासने(Hamas) इस्रायलवर(Israel) रॉकेट डागले. इस्रायलनेही गाझावर हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिले. यामुळे, गाझा पट्टीमध्ये 20 जणांसह काही मुलांचा ही मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, इस्राईलवर हमासच्या केलेल्या हल्याचा परिणामही सोसावा लागला. आज मंगळवारी सकाळी झालेल्या रॉकेट हल्ल्यात सहा सामान्य लोक जखमी झाल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले. फिलीस्तीन आणि इस्त्राईल या दोघांनी जेरुसलेमवर(Jerusalem) राज्यकरायचे आहे आणि हेच या हिंसाचाराचे प्रमुख कारण आहे. जेरुसलेम आणि वेस्ट बँक भागात इस्त्रायली सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत गेल्या 24 तासांत 700 हून अधिक पॅलेस्टिनी जखमी झाले. त्यातील 500 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Hamas attacks Israel)

अलिकडच्या आठवड्यांत, पॅलेस्टिनी निदर्शक आणि इस्त्रायली पोलिसांमधील संघर्षांमुळे जेरूसलेम मधील तणाव वाढला आहे. जेरूसलेमच्या शेख जर्रा जिल्ह्यात राहणाऱ्या पॅलेस्टाईन कुटुंबांना घरे रिकामी करण्यास सांगण्याचे सांगितल्याने हा तणाव वाढला आहे.  पॅलेस्टाईन जनतेला पाठिंबा देणार्‍या हमासने इस्राईलवर रॉकेट हमला केला आहे. आंदोलनकर्त्यांविरोधात होणार्‍या कारवाईविरोधात सूड उगवण्याचा इशारा हमासने आधीच दिला होता. 

हमास म्हणजे काय आणि गाझा पट्टीमध्ये त्याची भूमिका काय आहे?

हमास एक फिलिस्तीनी राजकीय संस्था आणि दहशतवादी गट आहे. १९८७ मध्ये इस्त्राईलच्या स्थापनेपासूनच याने युद्ध पुकारले आहे. रॉकेट हल्ले आणि आत्मघाती हल्ल्याद्वारे हमासने इस्राईलला लक्ष्य केले आहे. इस्त्राईलचा भाग फिलिस्तीनी राज्यात आणण्याचा त्याचा मुख्य उद्देश आहे. हमास फिलिस्तीनी प्राधिकरणापासून स्वतंत्रपणे गाझा पट्टी नियंत्रित करत आहे. या दहशतवादी संघटनेच्या सनदात इस्त्राईलच्या विध्वंसचा उल्लेख आहे.

तेव्हापासून ते गाझामध्ये सरकार चालवत आहेत

या दहशतवादी गटाने 1990 ते 2000 दरम्यान इस्रायलवर आत्मघातकी हल्ले केले. पण अलिकडच्या वर्षांत त्याने रॉकेट व मोर्टारने इस्राईलला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ही संस्था फिलिस्तीनी लोकांना सामाजिक सेवांचे एक मजबूत नेटवर्क देखील देते. 2006 मध्ये फिलिस्तीनी विधानसभेच्या निवडणुकीत हमासला बहुमतांपेक्षा जास्त जागा मिळवल्या अशाप्रकारे, वेस्ट बँक आणि गाझावरील त्याची पकड आणखी मजबूत झाली. परंतु फिलिस्तीनी प्राधिकरणाने इस्राईलबरोबर केलेला करार मान्य करण्यास नकार दिला. यानंतर पाश्चात्य देशांकडून फिलिस्तीनीसाठी मदत थांबविण्यात आली. त्याच वेळी फिलिस्तीनी लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) आणि हमास यांच्यात तणाव वाढला आणि परिणामी 2007 मध्ये हमासने गाझाचा संपूर्ण ताबा घेतला. तेव्हापासून ते गाझामध्ये सरकार चालवत आहेत.

इस्राईलबरोबर हमासचा वाद काय आहे?
हमास इस्राईलला एक देश म्हणून मान्यता देत नाही. असे मानले जाते की ज्यू देशाने फिलिस्तीनी लोकांच्या भूमीवर कब्जा केला आहे. गाझा पट्टीवर नियंत्रिण मिळविल्यानंतर इस्राईलने त्यास शत्रूंचा प्रदेश म्हणून घोषित केले. इस्रायलने गाझाला दिला जाणारा   वीजपुरवठा थांबवला तेव्हापासून हमास आणि इस्रायलमधील वाद वाढू लागला आणि दोघांनी एकमेकांवर रॉकेट चालवायला सुरुवात केली.

2008 मध्ये दोघांमध्ये शांतता करार झाला होता, परंतु तो बराच काळ टिकला नाही.  2014 पासून, दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढू लागले आणि हवाई हल्ले वाढू लागले. मध्यंतरी वेस्ट बँकमध्ये तीन इस्त्रायली तरुण मृतावस्थेत आढळले हे या हवाई हल्ल्या मागचे मुख्य कारण ठरले. हमासने त्यांची हत्या केल्याचा आरोप इस्त्राईलने केला. हमासमध्ये बहुधा इस्रायलविरोधात निदर्शने केली जातात. हमासला फिलिस्तीनला इस्त्राईलऐवजी स्वतंत्र देश म्हणून पहायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com