जनतेचा आदर करणारा नेता हवा- हॅरिस

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

जनतेचा आदर करणारा आणि त्यांचा स्वाभिमान परत मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणारा नेता अमेरिकेला अध्यक्ष म्हणून हवा आहे, असे सांगत अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ज्यो बायडेन यांना मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले. 

वॉशिंग्टन : जनतेचा आदर करणारा आणि त्यांचा स्वाभिमान परत मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणारा नेता अमेरिकेला अध्यक्ष म्हणून हवा आहे, असे सांगत अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ज्यो बायडेन यांना मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले. 

एका प्रचारसभेत बोलताना कमला हॅरिस यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. ‘ट्रम्प यांच्या धोरणांमुळेच संसर्ग वाढला आणि देशाची अर्थव्यवस्था खालावली. अमेरिकेत ८० लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. असे व्हायला नको होते. असे असूनही अध्यक्ष वास्तवाकडे दुर्लक्ष करत त्यांच्यावरील जबाबदारी नाकारत आहेत. आपल्याला आता जनतेचा आदर कशात आहे, हे समजणारा आणि स्वाभिमान परत मिळवून देणारा अध्यक्ष हवा आहे,’ असे हॅरिस म्हणाल्या. ट्रम्प हे अध्यक्षपदासाठी लायक नसल्याची टीकाही त्यांनी केली. हॅरिस यांच्या या सभेला १५० जण उपस्थित होते. हे सर्व जण सुरक्षित अंतर ठेवून बसले होते. ट्रम्प यांच्या सभांना गर्दी होत आहे. त्यामुळे ट्रम्प हे कोरोनाकडे दुर्लक्ष करत असल्यानेच संसर्ग वाढत असल्याची टीका डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते करत आहेत.

 
ओबामा यांचे टीकास्त्र 
‘ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्याकडे अमेरिकेला संकटातून बाहेर काढण्याची योजना तयार आहे. त्यांच्या निवडून येण्याने सत्तेमध्ये नैतिकता आणि नेतृत्व परत येईल,’ असे सांगत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी बायडेन यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. ‘आपण चांगल्या गोष्टीसाठी आणखी चार वर्षे वाट पाहू शकत नाही. केवळ ट्विट केल्याने अडचणी दूर होत नाहीत. त्यासाठी योजना आखाव्या लागतात,’  : जनतेचा आदर करणारा आणि त्यांचा स्वाभिमान परत मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणारा नेता अमेरिकेला अध्यक्ष म्हणून हवा आहे, असे सांगत अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ज्यो बायडेन यांना मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले. 

 

संबंधित बातम्या