Prophet Row: स्पष्टीकरणाची अपेक्षा नाही, बांगलादेशच्या मत्र्यांचं विधान

बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ हसन महमूद म्हणाले Prophet Remarks Row ही भारताची अंतर्गत बाब
Muhammad Hasan Mahmud
Member of the Bangladeshi Jatiya Sangsad
Muhammad Hasan Mahmud Member of the Bangladeshi Jatiya SangsadTwitter/@DrMuhammadHasa2

ढाका: बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ हसन महमूद (Hasan Mahmud) यांनी भारतात सुरू असलेलया प्रेषित मोहम्मद पैगंबर प्रकरणाबाबत (Prophet Remarks Row) मोठे विधान केले. मोहम्मद पैगंबर (Prophet Mohammad) यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले. पैगंबर यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे, असे महमूद म्हणाले. दरम्यान दिल्ली पोलिसांनी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे आणि नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Prophet Mohammad)

भारतातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाशी संभाषणात महमूद म्हणाले, "प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात कुठेही काहीही घडले तरी त्याचा निषेध केला पाहिजे, आणि आम्ही ज्यांनी पैगंबरांवर टिप्पणी केली त्या लोकांवर कायदेशीर कारवाई केल्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन करतो. या प्रकरणी भारतात एफआयआर नोंदवण्यात आला असून त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल, अशी आशा डॉ. महमूद यांनी व्यक्त केली. अरबसह इतर देशांप्रमाणे बांगलादेश सरकारचा अधिकृतपणे निषेध न करण्याच्या संदर्भात त्यांनी ही आपल्या देशाची बाह्य बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही भारताची अंतर्गत बाब आहे. जगात कुठेही काही घडले तरी काही इस्लामिक पक्ष इथे निषेध करतात पण इथे बांगलादेशात हा मुद्दा अरब देश, पाकिस्तान आणि मलेशियासारखा लक्ष वेधून घेणारा नाही, असे डॉ. महमूद यांनी सांगितले.

Muhammad Hasan Mahmud
Member of the Bangladeshi Jatiya Sangsad
पैगंबर विवाद: भारताविरोधात पाकिस्तान चालवतोय सोशल मीडियावर 'नापाक' मोहिम

सरकार तडजोड करत नाही

पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारवर या प्रकरणात तडजोड केल्याचा आरोप करणाऱ्या कट्टरतावादी घटकांच्या प्रश्नावर डॉ. महमूद यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, "बांगलादेश सरकार पैगंबरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या बाबतीत तडजोड करत नाही आणि कधीही करणार नाही. मी स्वतः जाहीर सभेत या प्रकरणाचा निषेध केला आहे. बांगलादेशात काही कट्टरगट आहेत जे संख्येने खूप कमी असूनही आणि कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळत नसतानाही जोरदार आवाज उठवतात. कधीकधी त्यांचे शब्द भारतीय मीडियाचे लक्ष वेधून घेतात आणि बांगलादेशातही असेच काहिसे घडते. त्याचप्रमाणे देशांतर्गत राजकारणामुळे बांगलादेश आणि तेथील लोकांविरुद्ध भारतातील नेत्यांनी केलेली विधाने येथे प्रसिद्ध होतात."

भारतातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा अहमदाबादच्या कोणत्याही दुर्गम भागात, एखाद्या नेत्याचे विधान अनेक वेळा हेडलाईन बनते. येथील काही न्यूज पोर्टल हे अशा प्रकारे प्रदर्शित करतात की तो देशात महत्वाचा मुद्दा बनतो. अनेक वृत्तपत्रेही त्यांना यात साथ देतात, ज्यांचा उद्देश केवळ चुकीची प्रतिमा मांडणे एवढाच असतो, असे म्हणत महमूद यांनी भारतीय मिडियावरही निशाना साधला आहे.

आमचे भारताशी अतिशय जवळचे संबंध

भारताच्या गृहमंत्र्यांनी यापूर्वी बांगलादेशातील जनतेला केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत महमूद म्हणाले की, 'देशांतर्गत राजकारणामुळे अशी विधाने केली जातात. आमचे भारताशी अतिशय जवळचे संबंध आहेत आणि आम्हाला समजते की अंतर्गत राजकारणामुळे नेते अनेक गोष्टी बोलतात. त्यामुळे अशा भाषणांबाबत आम्हाला स्पष्टीकरणाची अपेक्षा नाही.

Muhammad Hasan Mahmud
Member of the Bangladeshi Jatiya Sangsad
चांगले संबंध राखणे भारत आणि चीन दोघांच्याही हिताचे; चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे

भारत सरकारने महामारीच्या काळात ढाका येथे 110 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या यावरून भारत आणि बांगलादेशमधील संबंध किती खोल आहेत हे दिसून येते.बांगलादेशची स्थिती सामाजिक, आर्थिक आणि मानवी निर्देशांकाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा खूपच चांगली आहे. असे म्हणत बांगलादेशने पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली खूप विकास केला असून त्यांची प्रगती उल्लेखनीय असल्याचा दावा महमूद यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com