अमेरिकेत बर्फवृष्टीनंतर हवाई उड्डाणे रद्द

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

अमेरिकेत अतिवृष्टीमुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या देशाच्या बर्‍याच भागात बर्फवृष्टी झाली आणि सगळीकडे बर्फ पसरले आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेत अतिवृष्टीमुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या देशाच्या बर्‍याच भागात बर्फवृष्टी झाली आणि सगळीकडे बर्फ पसरले आहे. या घटनेनंतर हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याचबोरबर वाहनांना ये-जा करण्यास देखील त्रास होत आहे. दक्षिणेला टेक्सासच्या गल्फ कोस्ट पर्यंत ही बर्फवृष्टी झाली आहे. “सामान्यत: सुदूर दक्षिणेकडील लोक अशा प्रकारच्या थंड हवेचा सामना नाही करू शकत.” असे राष्ट्रीय हवामान सेवेच्या हवामान अंदाज केंद्राचे हवामानशास्त्रज्ञ मार्क चेनार्ड यांनी सांगितले.

या थंडीच्या वादळामुळे वीजपुरवठा ठप्प, रस्तावर होणारा अडथळा यासारख्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लोकांना तयार राहण्यास ह्यूस्टनमधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या दरम्यान रविवारी झालेल्या पावसामुळे ह्युस्टन भागात तापमान अतिशीत झाले आहे.  सोमवारी दक्षिणेकडील मैदानात 12 इंच पर्यंत बर्फ पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा बराचसा भाग अजूनही थंड वातावरणाने प्रभावित आहे, परंतु दक्षिणेपर्यंत अशा परिस्थितीची निर्मिती जवळजवळ दुर्मिळ आहे. असे चेनार्ड म्हणाले.

'आपत्ती' इशारा जारी

टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अ‍ॅबॉट यांनी राज्यातील सर्व 254 काऊंटीसाठी आपत्ती चा इशारा दिला आहे. 'टेक्सासमध्ये अत्यंत धोकादायक बर्फवृष्टी होत आहे.' असे ते शनिवारी म्हणाले. रविवारी रात्री अध्यक्ष जो बायडेन यांनी टेक्सासमध्ये आपत्कालीन स्थितीची घोषणा केली आणि राज्याला फेडरल सरकारला मदत देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 760 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

पाकिस्तानच्या माजी सैन्य अधिकाऱ्यानेच केलं इम्रान सरकारचं वस्त्रहरण - 

बर्फवृष्टी चा अंदाज पाहता ओरेगनच्या राज्यपाल केट ब्राऊन यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. 'खराब हवामानामुळे, वीज आणि रहदारीशी संबंधित समस्या येत आहेत. स्थानिक आपत्कालीन दलासह काम केले जात आहे, जेणेकरून संपर्काशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतील. अमेरिकेतील सर्वात जास्त बेघर लोकांसाठी व्यवस्था केली जात आहे. या लोकांना थंडीपासून वाचवण्यासाठी प्रशासन आतून उबदार अशी निवारा घरे बांधत आहे,' असे त्यांनी  सांगितले.

या देशात आली इबोलाची महामारी -

संबंधित बातम्या