हेल्मेट घेऊ शकणार मानवी मनाचा वेध

 हेल्मेट घेऊ शकणार मानवी मनाचा वेध
Helmets can read the human mind

Innovation :  गेल्या अनेक दशकापासून मानवी मनाचे (Human Mind) वाचन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला आता यश मिळालेले आहे. कर्नल या अमेरिकन कंपनीने एक नवे हेल्मेट (Helmet) लॉच  केले आहे. त्या  हेल्मेटद्वारे (Helmet) मानवी मनाला(Human Mind) वाचू  शकतो. तसेच एखाद्याच्या मनात असलेले विचार बोलून सांगू शकतो. (Helmets can read the human mind)

कर्नच्या या खास हेल्मेटची (Helmet) किंमत अमेरिकेत 50,000 डॉलर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे सेंसर्स आणि इलेक्ट्रॉनिक डायोड लागले आहे. यामुळे व्यक्तीच्या मनात चालू असलेल्या गोष्टी वाचता येतात. यापूर्वी देखील असे डिवाईस अस्तित्वात होते , परंतु त्याचा आकार एका खोली एवढा असून ते महाग होते. 


या पूर्वीच्या डिवाईस मधील अडथळे दूर करून नवे हेल्मेट लॉच करण्यात आले आहे. या हेल्मेटचा वापर आपण प्रवासात देखील करू शकतो. कर्नलने दिलेल्या माहितीनुसार 
लवकरच हे हेल्मेट बाजारात विक्रीसाठी आणले जाणार आहे. कंपनीच्या मते , ब्रेन टेस्ट करणे खूप महाग आहे. अशा परिस्थितीत ही हेल्मेट उपयुक्त ठरणारे आहे. कंपनीचे 
सीईओ ब्रायन जॉन्सन यांनी सांगितले की या हेलमेटला तयार करण्यासाठी पाच वर्ष लागले असून 815 करोंड रुपये खर्च झाले आहे. 

जॉन्सनच्या मते ,हृदय, मेंदू, रक्त आणि DNA च्या चाचण्या करणे स्वस्त झाले आहे. परंतु मेंदूची चाचणी करणे आजही महागात पडते. जॉन्सनला या प्रोजेक्टसाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. ही कंपनी मेंदू संशोधन करणाऱ्या संस्थामध्ये सर्वात पहिली हेल्मेट बनवणारी ठरली आहे. जॉन्सनचे म्हणणे आहे की 2030 पर्यंत स्मार्टफोनची कींमत कमी झाली पाहिजे. तसेच प्रत्येक अमेरिकन नागरिकांकडे ही हेल्मेट असायला हवे. जॉन्सनचा असा विश्वास आहे की हे हेल्मेट बाजारात आल्यानंतर लोक त्यांच्या मानसिक आजाराला गाभीर्याने घेतील.   


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com