बांग्लादेशमधील हिफाजत-ए-इस्लाम संघटनेचा हिंदू गावावर हल्ला

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

धार्मिक मुद्द्यावरुन हिंसाचार घडवण्याचा प्रय़त्न केला जात असल्याचा आरोप हिफाजत-ए-इस्लाम संघंटनेने केला आहे.

ढाका: हिफाजत-ए-इस्लाम या बांग्लादेशमधील संघटनेच्या हजारो समर्थकांनी शाल्ला उपजिल्हा येथील सुमानगंजमधील एका हिंदू गावावर हल्ला केला. सोमवारी या संघटनेच्या काही नेत्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी देण्यात आलेल्या भाषणामध्ये हल्ला झालेल्या गावातील एका व्यक्तीने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एका इस्लाम धर्मगुरुंच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यानंतर संतापलेल्या या संघटनेच्या समर्थकांनी हिंदू गावातील 80 घरांची नासधूस केली.

देराई उपजिल्हा येथे झालेल्या एका कार्यक्रामात हिफाजत-ए-इस्लाम संघटनेचे आमीर अल्लाम, बाबनागुराई, मौलाना मुफ्ती मामुनल हक आणि संघंटनेचे महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बाबनागुराई मौलाना यांनी बोलताना नागौवमधील एका हिंदू तरुणाने फेसबुकवर केलेल्या पोस्टचा उल्लेख करत त्याने आपल्यावर टिका केली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मौलाना यांच्या भाषणानंतर त्यांच्या संघटनेच्या काही समर्थकांनी या गावावर सशस्त्र हल्ला केला. धार्मिक मुद्द्यावरुन हिंसाचार घडवण्याचा प्रय़त्न केला जात असल्याचा आरोप हिफाजत-ए-इस्लाम संघंटनेने केला आहे. मात्र त्यानंतर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी काशीपूर, चंदीपूर, नाचीन आणि इतर भागामध्ये दिसून आले. काही मुस्लीम व्यक्तींनी नागौववर हल्ला केला आहे.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका लसीला आता 'या' देशाने दिली स्थगिती  

नागौव परिसरातील अनेक हिंदू कुटुंबीयांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गावे सोडली आहेत असं वृत्त ढाका ट्रिब्युनने दिले आहे. अनेक हिंदूनी गावे सोडल्यानंतर हिफाजत-ए-इस्लाम संघटनेच्या समर्थकांनी घरांची तोडफोड करत घरातील वस्तू चोरल्याची माहिती समोर आली आहे. परखड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या मूळच्या बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही या घटनेच्य़ा संदर्भत माहिती दिली आहे. ''बांग्लादेशातील इस्लामच्या सैनिकांनी आज सुमानगंजमधील एक हिंदू गावाची नासधूस केली. तसं बांग्लादेशामध्ये हे फार दुर्मीळ चित्र नाही,'' असा टोला लेखिका तस्लिमा नसरीन यांनी हल्लेखोरांचा फोटो ट्विट करत लगावला आहे.

 

संबंधित बातम्या