शेअर मार्केट: दिवसाच्या सुरूवातीलाच सेन्सेक्समध्ये मोठी वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

उपचारांना चांगला प्रतिसाद देणाऱ्या ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दलच्या सकारात्मक बातम्यांमुळे वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात मंगळवारी तेजीचे चित्र दिसून आले होते.

वॉशिंग्टन डी. सी.- अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनातून बरे झाले आहेत. ते व्हाईट हाऊसला परतल्यापासून जागतिक भांडवली बाजारावर त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. आज दिवसाच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सने भरारी घेतली. दिवसाच्या सुरुवातीलाच 11.84 अंशांनी वाढ झाली. या वाढीमुळे सेन्सेक्स (Sensex) 39,586.41 वर गेला आहे. 

मागील सत्रात सेन्सेक्स तब्बल 600.87 अशांनी वाढला होता. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांकातही 159.05 अंशांनी वाढ होऊन 11,662.40 या पातळीवर विसावला होता.

उपचारांना चांगला प्रतिसाद देणाऱ्या ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दलच्या सकारात्मक बातम्यांमुळे वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात मंगळवारी तेजीचे चित्र दिसून आले होते. अमेरिकेत सरकारच्या प्रोत्साहन पॅकेजच्या आशावादाने भांडवली बाजारातील सकारात्मक भावनांना आणखीन चांगली चालना मिळत आहे.  

रिजर्व बँकेची पतधोरणाची द्विमासिक बैठक लांबणीवर गेली होती. आता ती आजपासून सुरु होत आहे. एमपीसीवर सरकारकडून सोमवारी रात्री तीन सदस्यांना नियुक्त केले आहे. त्यामध्ये जयंत वर्मा, अशिमा गोयल आणि शशांक भिडेंचा समावेश आहे.

संबंधित बातम्या