पाकच्या ISI चा इंडियन आर्मीचा अधिकारी समजून 'हनी ट्रप' चा प्रयत्न फसला; तो व्यक्ती निघाला...

india 4.jpg
india 4.jpg

भारतातील लष्करी अधिकाऱ्याला (military officer in India) पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (Inter Services Intelligence) हनी ट्रॅप (Honey Trap) करण्याचा प्रयत्न करत होती अशी माहिती समोर आली आहे. मात्र आता त्या व्यक्तीला पोलिसांद्वारे अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर ती व्यक्ती तोतया लष्करी अधिकारी असल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती लष्करी अधिकारी असल्यासारखे वावरत असल्याचे शनिवारी दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांनी सांगितले आहे.

दिल्लीमधील मोहन गार्डन (Mohan Garden) येथील रहिवासी असलेला दिलीप कुमार (Dilip Kumar) बनावट लष्करी अधिकारी म्हणून गुप्तचर अधिकारी, आयबी (IB)  आणि दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या व्यक्तीची चौकशी करण्यासाठी पोहोचले आहे. या बनावट अधिकाऱ्याकडून दिल्ली पोलिसांनी बनावट आर्मी आयडी कार्ड आणि एक मोबाईल फोम जप्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीप कुमार याला भारतीय लष्कराचा अधिकारी समजून हनी ट्रपच्या माध्यमातून पाकिस्तानी  पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेली आयएसआयशी संबंधित लोक त्या व्यक्तीकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. (Honey Trumps attempt failed as an Indian Army officer of Pakistans ISI The man left)

100 हून अधिक लोकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य
या आगोदर ग्रेटर कैलास (Greater Callas) 1 मधील अर्चना रेड लाईटजवळ सैन्य अधिकारी असल्याचे दिलीप कुमार सांगत फिरत होता. मात्र दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी या बनावट अधिकाऱ्याला अटक केली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो 100 हून अधिक लोकांच्या  व्हॉट्सअॅप (WhatsApp) ग्रुपचा सदस्य आहे तसेच तो 100 हून अधिक महिलांच्या संपर्कामध्ये होता. इतर अनेक देशातील  व्हॉट्सअॅप नंबरशीही तो संपर्कात होता, असे पोलिसांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हिडिओ कॉल
दिलीप कुमारच्या मोबाईलची तपासणी केली असता त्याने अनेक देशातील आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हिडिओ कॉलही केल्याचे आढळले. आरोपीने चौकशीदरम्यान सोशल मिडियावर महिलांना प्रभावित करण्यासाठी स्वता: चा उल्लेख भारतीय आर्मीचा कॅप्टन शेखर (Captain Shekhar) असल्याचे सांगितले आहे. तसेच आरोपीने काही परदेशी नागरिकांशीही संवाद साधला असून त्यांच्याबरोबर काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिस कसून चौकशी करत आहेत.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com