डोनाल्ड ट्रम्प राजीनामा न दिल्यास महाभियोग चालवण्याचा इशारा"- नन्सि पलोसी 

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपीटल हिलवर हल्ला करण्यास फूस दिली होती या कारणाने ट्रम्प यांनी तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा महाभियोग चालवण्याचा इशारा प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी दिला आहे

वॉशिंग्टन: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपीटल हिलवर हल्ला करण्यास फूस दिली होती या कारणाने ट्रम्प यांनी तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा महाभियोग चालवण्याचा इशारा प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी दिला आहे.ट्रम्प यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी सर्व प्रतिनिधींची इच्छा आहे.पण जर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यास तर आपण नियम समितीला 25 वी घटनादुरुस्तीचा कायदा करुन त्यांच्या विरोधात महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा प्रस्ताव दाखल करु.तसेच ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन हटवण्यासाठी 25 वी घटनादुरुस्ती व्यतिरीक्त इतरही पर्याय  उपलब्ध असल्याचे यावेळी पलोसी यांनी सांगितले.

त्यांनी महाभियोगाच्या मुद्द्यावर डेमॉक्रॅट्रिक पक्षांतील सदस्यांशी तासभर चर्चा केली.ट्रम्प यांच्या विरोधात सध्या दोन महाभियोगाचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत.डेव्हिड सीसीलाइन आणि टेड लिऊ तसेच जेमी रस्कीन यांनी महाभियोगाच्या काही तरतूदी लागू करण्याचे मत नोंदवले आहे.यात ट्रम्प यांच्यावर अमेरीकेत हिंसाचार पसरवण्यासाठी उत्तेजन देणे.त्याचबरोबर जॉर्जियाच्या पदाधिकाऱ्यांवर फेरमतमोजणीसाठी दबाव आणणे या दोन्ही प्रकरणात ट्रम्प यांनी दोषी ठरवण्याचे उद्देश साध्य होतात.अमेरिकी कॉंग्रेस परराष्ट्र समीतीचे अध्यक्ष ग्रेगरी मिक्स यांनी अमेरिकेत हिंसाचार पसरवण्यासाठी ट्रम्प जबाबदार आहेत.आणि यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याचे आवाहन केले

त्यासंबंधीचे पत्र ही पलोसी यांना पाठवले.बुधवारी झालेल्या भयानक हिंसाचाराच्यावेळी ट्रम्प यांनी ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन केले होते.आणि आता पुन्हा एखदा हिंसाचार घडण्याची भिती असल्याच्या कारणाने ट्विटरने ट्रम्प यांचे खाते बंद केले आहे.या संबंधीचा निर्णय लोकहिताचा विचार करुन घेण्यात आला असल्याचं ट्विटरने सांगितले आहे.मात्र ट्रम्प यांनी ट्विटरवर हल्लाबोल केला, माझा आणि माझ्या समर्थकांचा आवाज दडपून टाकता येणार नाही असं यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे.तसेच आम्ही दुसऱ्या अन्य समाजमाध्यमांशी चर्चा करत आहोत लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नजीकच्या काळात आपण स्व:चे व्यासपीठ स्थापन करणार आहोत.आपण गप्प बसणार नाही.ट्रम्प यांनी ट्विटरवरप्रमाणे समांतर व्यवस्था चालवणार असल्याचे संकेत दिले.

 

आणखी वाचा

इंडोनेशियात ६२ प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान समुद्रात कोसळलं

संबंधित बातम्या