‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’

पीटीआय
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

अध्यक्षीय निवडणुकीत मोदींचा व्हिडिओ

वॉशिंग्टन:  अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय-अमेरिकी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या प्रचार मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिडिओचा वापर केला जात आहे. गेल्या वर्षी मोदी आणि ट्रम्प यांच्या ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ या दोन ऐतिहासिक रॅलीतील हे व्हिडिओ आहेत. दरम्यान, अशाच प्रकारचा व्हिडिओ ट्रम्प यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.

मोदी व ट्रम्प ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हातात हात घालून चालतानाचा हा एकत्रित व्हिडिओ १०७ सेकंदाचा आहे. ‘आणखी चार वर्षे’ नावाच्या  व्हिडिओत ट्रम्प यांना अध्यक्षपदाची आणखी एक संधी देण्याचे आवाहन केले आहे. मेलिना ट्रम्प यावर्षी भारत दौऱ्यावर असतानाच्या व्हिडिओचा भागही या व्हिडिओला जोडण्यात आला आहे. त्यात त्या अहमदाबादेत जनसमुदायाला हात हालवून अभिवादन करताना दिसतात. शेवटी ट्रम्प अमेरिकेच्या भारताबरोबरच्या मैत्रीची  ग्वाही देताना दिसतात.  

संबंधित बातम्या