गाईला मिठी मारा आणि ताणतणावातून मुक्त व्हा; अमेरिकेत ट्रेंड होतोय Cow Hug 

cow hug.jpg
cow hug.jpg

कोरोना विषाणूच्या (CoronaVirus)  दुसर्‍या लाटेमुळे देश व जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोविडच्या संसर्गामुळे आतापर्यंत जगभरात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोविड संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील देशांनी लॉकडाऊन (LockDown)  लागू केले आहे. तर संपूर्ण जग लॉकडाऊन अंतर्गत आज घरात कैद झाले आहे.  अशा परिस्थितीमुळे लोकांमध्ये  नैराश्य (Depression),  ताणतणाव (Stress) अशा समस्या निर्माण होत  आहेत. यावर लोक   वेगवेगळ्या मार्गाने मार्गाने मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु अमेरिका (America) आणि युरोपमध्ये (Europe)  ताणतणाव, नैराश्य घालवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या काढल्या जात आहेत. यात सर्वाधिक चर्चा आहे ती गाईला मिठी मारण्याची (Cow Hug). मानसिक शांततेसाठी अमेरिका आणि युरोपमधील लोक गायीला मिठी  मारत आहेत. यासाठी ते 200 डॉलर भरायलाही तयार आहेत.  (Hug the cow and get rid of the stress; Cow Hug is a trend in America) 

गायीला मिठी मारण्याचा ट्रेंड
कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सीएनबीसीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमेरिकेत लोक गायीला मिठी मारण्यासाठी एका तासाला 200 डॉलर्स द्यायलाही तयार आहेत.  भारतही यात पुढे असल्याचे देवरा यांनी यात स्पष्ट केले आहे.   भारतात  3००० वर्षांपासून या गायींची पूजा केली जाते.  गाईला मिठी मारण्याने केवळ ताणतणावातून मुक्तता मिळते इतकेच नाही तर मानासिक आरोग्याच्या बाबतीतही पाळीव प्राण्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तसे, भारतात गायीला  मिठी मारण्याची परंपरा खूप जुनी आहे आणि आता जगातही हा ट्रेंड वाढत आहे.

ताण संप्रेरक कमी करते
गायीला मिठी मारण्याची भावना ही घरातील लहान मुले किंवा पाळीव पप्राण्यांना मिठी मारण्या सारखीच आहे. एक आनंदाची मिठी (Happy Hug) हार्मोन ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामाइन ट्रिगर करतो.  जो कोर्टिसोल (तणाव संप्रेरक) कमी करतो. गाईला एक मिठी मारल्याने ताणतणावाची पातळी, चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी होते. 

'गाईची मिठी' रोग प्रतिकारशक्ती नियंत्रित करते
गाय शांत, सौम्य आणि स्वभावाची असते. गाईच्या एका मिठीमुळे जनावराचे उबदार शरीराचे तापमान, ह्रदयाचे ठोके आणि मोठ्या आकाराचा फायदा होतो. हे सर्व शरीराची चयापचय क्रिया, रोग प्रतिकारशक्ती आणि तणावाच्या प्रतिक्रियेचे नियमन करण्यास मदत करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com