मानवाधिकाराचा "चॅंपियन" पाकिस्तान स्वत: काचेच्या घरात राहतो

 Pakistan
Pakistan

पाकिस्तान इस्रायलविरोधात(Pakistan on Israel) नेहमीच काही ना काही विधान करत असतानाही पाकिस्तानच्या चर्चेकडे इस्रायल काही विशेष लक्ष देत नाही. पण यावेळी इस्रायलने पाकिस्तानला (Israel Slams Pakistan) चागंलच पलट उत्तर दिलं आहे. पाकिस्तान स्वत: काचेच्या घरात राहत असल्याचे इस्राइलने म्हटले आहे. वास्तविक असे झाले की, गुरुवारी पाकिस्तानच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मंत्र्यांनी जाहीर केलेली मुत्सद्देगिरीचे ट्विट केले होते. ज्यामध्ये असे लिहिले होते की, पूर्व जेरुसलेमसह व्यापलेल्या पॅलेस्टाइनच्या भूभागातील मानवाधिकारांच्या भयानक परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत एक सत्र आयोजित करण्यात आले आहे'.

ट्विटमध्ये पुढे लिहिले होते की, 'ही बैठक परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि या प्रकरणात यूएनएचआरसीकडून काय अपेक्षित आहे यावर चर्चा होईल.' इस्त्रायली परराष्ट्र मंत्रालयाचे महाव्यवस्थापक अलोन उश्पिज यांनी पाकिस्तानचे हेच ​​ट्विट रीट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'मानवाधिकारांचा चॅम्पियन' असलेला पाकिस्तान स्वत: काचेच्या घरात राहतो. तो सध्या यूएनएचआरसीमध्ये इस्त्राईलला ज्ञान वाटत आहे, हा मध्यपूर्वेतील एकमेव लोकशाही देश आहे. ढोंगीपणाचे हे सर्वोत्कृष्ट रूप आहे.

अमेरिकेचा अहवालही शेअर करतो
या ट्विटमध्ये अलोन उष्पिज यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानमधील मानवी हक्कांच्या परिस्थितीबद्दल तयार केलेल्या अहवालाची लिंकही शेअर केली. या अहवालात पाकिस्तानमधील मानवाधिकारांबद्दल गंभीर चिंता निर्माण झाल्याचे दिसत आहे. इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या(Israel Foreign Ministry) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून उष्पिज यांनी हे रीट्विट केले आहे. गुरुवारी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत इस्रायलविरोधात एक ठराव मांडला गेला. ज्यामध्ये पाकिस्तानसह 24 देशांनी मतदान केले आहे.

कुरैशी यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला
त्याचबरोबर हा प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल पाकिस्तानने आनंद व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने असे म्हटले आहे की यूएनएचआरसी, ओआयसी मधील इस्लामिक देशांच्या संघटनेने दिलेला प्रस्ताव पास झाला आहे, ज्याचे आम्ही स्वागत करतो. पॅलेस्टाईन प्रदेश व पूर्व जेरुसलेममधील मानवाधिकारांच्या स्थितीसंदर्भात हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यूएनएचआरसी या सत्राला संबोधित करताना कुरेशी यांनी पॅलेस्टाईनच्या बहाण्याने काश्मीरचा(Pakistan in UNHRC) मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पॅलेस्टाईनच्या लोकांची भारतातील काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांशी तुलना केली. पाकिस्तानचा त्या देशात समावेश आहे ज्यांने इस्राइलला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com