पाकिस्तानमध्ये पुन्हा हिंदूंना लक्ष्य; रावळपिंडीतील 100 वर्ष जुन्या मंदिरावर हल्ला

पाकिस्तानमध्ये पुन्हा हिंदूंना लक्ष्य; रावळपिंडीतील 100 वर्ष जुन्या मंदिरावर हल्ला
Hundred year old Hindu Rawalpindi temple attacked by unidentified people in Pakistan

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात 100 वर्षांहून अधिक जुन्या हिंदू मंदिरात अज्ञात लोकांच्या गटाने हल्ला केला आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीत अशी माहिती सांगण्यात आली आहे. सध्या या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तक्रारीनुसार मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पुराण किला भागात शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळीने मंदिरावर हल्ला केला आणि मुख्य गेट व वरच्या मजल्याचा दुसरा दरवाजा सोबत पायऱ्ंयाची तोडफोड केली आहे.

स्थानिक वृत्तानुसार, इव्हॅक्युए ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) उत्तर विभाग सुरक्षा अधिकारी सय्यद रजा अब्बास जैदी यांनी रावळपिंडीतील बन्नी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मागील एक महिन्यापासून मंदिराचे बांधकाम आणि नूतनीकरणाचे काम चालू आहे. मंदिरासमोर काही अतिक्रमणे होती, ती 24 मार्च रोजी हटविण्यात आली. मंदिरात धार्मिक उपक्रम सुरू तक्रारीत म्हटले आहे. 

जे लोक मंदिर आणि त्याच्या पवित्रतेला हानी पोहोचवतात त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी अतिक्रमणधारकांनी मंदिराच्या आजूबाजूला बरेच दिवस दुकाने बांधली होती. बराच काळ त्यांनी या ठिकाणी कब्जा केला होता.

जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने नुकतीच सर्व प्रकारच्या अतिक्रमणे हटविली आहे. मंदिराला अतिक्रमण मुक्त केल्यानंतर नूतनीकरणाचे काम सुरू झाले. दरम्यान, मंदिर प्रशासक ओम प्रकाश यांनी घटनेची माहिती दिली आणि सांगितले की, माहिती मिळताच रावलपिंडीचे पोलिस कर्मचारी मंदिराच्या परिसरात पोहोचले व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले. ‘मंदिर परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहे. मंदिरात होळी साजरी केली जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com