नववर्षाच्या जल्लोषानंतर रोमच्या रस्त्यांवर घडली ही क्लेशदायक घटना

दैनिक गोमन्तक
शनिवार, 2 जानेवारी 2021

नवीन वर्षाच्या संध्याकाळी  इटलिची  राजधानी रोममध्ये अनेक लोकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाई केल्यानंतर शेकडो पक्षी मरण पावले,

रोम : नवीन वर्षाच्या संध्याकाळी  इटलिची  राजधानी रोममध्ये अनेक लोकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाई केल्यानंतर शेकडो पक्षी मरण पावले,  या घटनेचा निषेध करून इटलीतील प्राणी-पक्षी अधिकार संरक्षण हक्क समूहाने शुक्रवारी याला  ‘हत्याकांड’ म्हटलं आहे.

रोमच्या मुख्य रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या रस्त्यांच्या कडेला  मृत पक्ष्यांचा खच पडल्याचं एका व्हीडिओ मध्ये दिसून येत आगे. अचानक झालेल्या या पक्षांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही, परंतु आंतरराष्ट्रीय संरक्षण संघटनेने (ओआयपीए) म्हटले आहे की, मध्यरात्री अचानक झालेल्या फटाक्यांच्या कर्कश्य आवाजाने पक्षी घाबरले असतिल आणि जीव वाचवण्यासाठी उडण्याचा प्रयत्न केला असेल, असे होऊ शकते की ते भीतीमुळे मरण पावले असेल. ते एकत्र उडाल्याने आणि एकमेकांना धडकल्याने किंवा उच्च व्होल्टेज विद्युत केबल्समध्ये अडकल्याने मरू शकतात. हृदयविकाराच्या झटक्याने देखील पक्षी मरू शकतात असे संस्थेच्या प्रवक्त्या लोरिडेना डिग्लीओ यांनी सांगितले.

 

फटाके उडवल्याने वन्य आणि पाळीव जनावरांना त्रास व दुखापत होते, असे त्यांनी नमूद केले.  रोम शहराने वैयक्तिक फटाक्यांच्या प्रदर्शनांवर बंदी आणली असून रात्री 10 नंतर कर्फ्यू असून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ओआयपीएच्या इटालियन शाखेने जनावरांना होणार्‍या धोक्याचे कारण देत वैयक्तिक वापरातील फटाके आणि फटाके विक्रीवरील बंदीची मागणी केली आहे. नविनवर्षाच्या पहिल्याच दिवशी फटाक्यांमुळे शेकडो पक्ष्यांचा जीव गेल्याने प्राणी प्रेमींकडून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

 

 

संबंधित बातम्या