China Viral Video: दहा दिवसांपासून मेंढ्यांचा कळप गोलगोल फिरतोय, जगभरातून व्यक्त होतयं आश्चर्य

उत्तर चीन प्रांतातील मोंगोलियातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.
China Viral Video
China Viral VideoDainik Gomantak

China Viral Video: सोशल मिडियावर नेहमीच काही अजब-गजब व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हायरल व्हिडिओ चीनमधून आला आहे. या व्हिडिओत शेकडो मेंढ्या मागील दहा दिवसांपासून एकामागून एक असे गोलाकार फिरत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून जगभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उत्तर चीन प्रांतातील मोंगोलियातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.

China Viral Video
'ऊठ मराठ्या ऊठ', 'कोश्यारी नावाचं पार्सल परत पाठवा'; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कोण काय म्हणाले?

मागील काही दिवसांपासून शेकडो मेंढ्या एकाच सर्कलमध्ये गोल फिरत आहेत. मेंढ्यांच्या या गोलाकार फिरण्यामागे कोणतं रहस्य दडलं आहे, याचा थांगपत्ता लागलेला नाही. या विचित्र प्रकाराबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मेंढ्यांना काही आजार झाला आहे का? चमत्कार आहे का? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.

China Viral Video
Men Stamina Diet: विवाहित पुरुषांचा 'स्टॅमिना' वाढवणारे पाच पदार्थ, आजच ट्राय करा

मेंढ्या थंडीपासून त्या मेंढ्या स्वत:ला सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतील, असं एका युजरने कमेंट करुन म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने त्या एलियन्स असल्याचे म्हटल आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com