अफगाणिस्तानवर भूकबळीचं संकट; पोट भरण्यासाठी मुलांची मृत्यूशी झूंज

तालिबान राजवटीत मुलांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Afghan children
Afghan childrenDainik Gomantak

अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू आहे. त्यापासून अफगाण महिला, पुरुषांनी काय करु नये यासाठी तालिबान राजवटीचे हस्तक वारंवार फतवे काढताना दिसताहेत. मात्र नागरिकांच्या अन्न वस्त्र आणि मुवभूत गरजा यांचा प्रश्न कसा सोडवावा, याबाबत ते काही बोलताना दिसत नाहीत. यामूळेच सद्या अफगाणमधील महिलांवरील निर्बंध वाढले आहेत. त्या देशातील मुलांची स्थिती बिकट झाली आहे. (Hunger crisis in Afghanistan )

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात लहान मुलांची तस्करी होत असताना, 8-10 वर्षांच्या मुलांना उपासमारीने जीवाशी खेळावे लागत आहे. अफगाणिस्तानच्या तोरखाम सीमेवर मानवी तस्कर 4-5 वर्षांच्या मुलांना मोठ्या ट्रकच्या चाकांना बांधतात.

Afghan children
भारताचा व्हिएतनामसोबत लॉजिस्टिक करार

मिळालेल्या माहितीनुसार या क्रूरतेमुळे अनेक मुले ट्रकमधून पडून मृत पावतात. तर 10 वर्षांपर्यंत लहान मुले सिगारेट, बॅटरी, खाद्यपदार्थ आणि स्थानिक पेये घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये लटकतात. या वस्तूंची विक्रीही पाकिस्तानच्या परिसरात बिनदिक्कतपणे केली जाते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानातील मानवी हक्कांची स्थिती बिकट झाली आहे.

Afghan children
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या मनसुब्यावर पाणी फिरले, सत्ताधारी आघाडीत नवा पेच

अफगाणिस्तानातील लढाई संपली असली तरी महिला आणि अल्पसंख्यांकांविरुद्ध मानवी हक्कांचे उल्लंघन सुरूच आहे. तालिबानने त्यांचा शिक्षणाचा आणि कामाचा हक्क हिरावून घेतला आहे. महिला आणि मुलींवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या काही आठवड्यांत अफगाणिस्तानात अल्पसंख्याकांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. मालिका बॉम्बस्फोटात अनेक अल्पसंख्याकांना जीव गमवावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com