''बांग्लादेशच्या स्वातंत्र्य़ासाठी मी सहकाऱ्यांसोबत सत्याग्रह केला होता''

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

माझं वय 20-22 वर्ष असताना मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांग्लादेशमधील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता.’’  

ढाका: बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा 50 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. यावेळी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करत त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला आहे. या ठिकाणी पोहचल्यानंतर मोदी यांनी ढाकामधील 'सावर' स्मारकास भेट दिली आहे. या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलं आणि व्हिजिटर्स बुकमध्ये संदेश लिहून स्वाक्षरीही केली.

यानंतर ढाकामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना म्हटले, ‘’बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षात सहभागी होणं माझ्या जीवनातील अंदोलनापैकी एक होतं. माझं वय 20-22 वर्ष असताना मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांग्लादेशमधील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता.’’ (I had satyagraha with my colleagues for the independence of Bangladesh)

तसेच ‘’मी आज भारतीय सैनिकांना सलाम करतो. जे बांग्लादेशच्य़ा मुक्तिसंग्रामात बांग्लादेशातील बंधू- भगिनी यांच्यासोबत उभे राहिले. मला आज अत्युच्च आनंद आहे की, बांग्लादेशच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतलेले अनेक भारतीय सैनिक आज कार्यक्रमात उपस्थीत आहेत,’’ असं देखील यावेळी मोदी म्हणाले.

लॉकडाऊन नंतर पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच विदेश दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशचे नायक शेख मुजीबर रहमान यांना मरणोत्तर 'गांधी शांती' पुरस्काराने गौरवले. मोदी यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे हा सन्मान सुपुर्द करुन शेख मुजीबर रहमान यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ''दोन्ही देशांचे संबंध अधिककाधिक घट्ट होत आहेत. हा सन्मान देताना मला अत्यंत आनंद होत आहे. बांग्लादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामीद, पंतप्रधान शेख हसीना आणि येथील उपस्थीत नागरिक यांचे आभार मानतो. तुम्ही गौरवशाली क्षणांमध्ये, या उत्सवात सामील होण्यासाठी भारताला सप्रेम निमंत्रण दिलं. मी सर्व भारतीयांच्या वतीने शेख मुजीबर रहमान यांना श्रध्दांजली अर्पण करतो. ज्यांनी बांग्लादेशच्या जनतेसाठी आपल्या जीवनाचा त्याग केला.'' 

 

संबंधित बातम्या