कराचीत हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड, परिसरात तणावानंतर पोलीस तैनात

कराचीमध्ये कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात बुधवारी देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली
कराचीत हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड, परिसरात तणावानंतर पोलीस तैनात
PakistanDainik Gomantak

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील कराची येथे एका हिंदू मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली. कराचीमध्ये कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात बुधवारी देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Hindu temple in Karachi Pakistan)

'द एक्सप्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमुळे कराचीतील हिंदू समुदायातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, विशेषत: कोरंगी भागात, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात राहणाऱ्या स्थानिक व्यक्तीने सांगितले की, 'मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी मंदिरावर हल्ला केला. पण आम्हाला माहित नाही की हल्ला नेमका कोणी आणि का केला.?'

कोरंगीचे स्टेशन प्रभारी यांनी गुन्हा दाखल केला

कोरंगीचे स्टेशन प्रभारी फारूक संजरानी यांनी सांगितले की, पाच ते सहा अज्ञात संशयितांनी मंदिरात प्रवेश केला आणि तोडफोड करून पळ काढला. मंदिरावर हल्ला करणाऱ्या अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये यापूर्वीही झाले हल्ले

याआधीही पाकिस्तानमध्ये अनेकदा हिंदू मंदिरांना जमावाकडून लक्ष्य करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये, कोट्रीमधील सिंधू नदीच्या काठावर असलेल्या एका ऐतिहासिक मंदिराला अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केले होते. याप्रकरणी कोटरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये 7.5 दशलक्ष हिंदू

पाकिस्तानच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 7.5 दशलक्ष हिंदू पाकिस्तानमध्ये राहतात. मात्र, देशात 90 लाखांहून अधिक हिंदू असल्याचे समाजाचे मत आहे. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com