बिडेन निवडून आल्यास भारताला फायदा : वर्मा

PTI
सोमवार, 20 जुलै 2020

संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत बदल घडवून आणण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याने या पार्श्वभूमीवर वर्मा यांनी हे विधान केले आहे.

वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या आगामी निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार ज्यो बिडेन हे सत्तेवर निवडून आल्यास भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी स्थान मिळावे यासाठी ते बदल घडवून आणू शकतात, असे मत अमेरिकेचे माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी व्यक्त केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत बदल घडवून आणण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याने या पार्श्वभूमीवर वर्मा यांनी हे विधान केले आहे.
अमेरिकी-भारतीय वंशाचे रिचर्ड वर्मा हे २०१४ ते २०१७ या कालावधीत अमेरिकेचे राजदूत म्हणून भारतात होते. सध्या ते बिडेन यांचा प्रचार करत आहेत. बिडेन यांचा प्रचार करताना वर्मा म्हणाले की, भारताला सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व देण्यासाठी बिडेन हे ‘यूएन’च्या रचनेत बदल करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. अमेरिकेचा मोठा संरक्षण भागीदार म्हणून असलेल्या भारताच्या अपेक्षाही ते पूर्ण करतील. ते भारताबरोबरील सहकार्य वाढवून अडचणीत साथ देतील. सीमावादावरही ते भारताच्या बाजूने ठाम उभे राहतील. अमेरिकेत तीन नोव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक होत असून डेमोक्रॅटिक पक्षाकडून बिडेन, तर रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी मिळणे जवळपास निश्‍चित आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या