इंडोनेशियामधील इले लेवोटोलोक ज्वालामुखी झाला जागृत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

इंडोनेशियामधील इले लेवोटोलोक ज्वालामुखी जागृत होऊन गरम राखेचे ढग निर्माण झाले आहेत. यामुळे परिसरातील हजारो लोक सुरक्षितस्थळी निघून गेले आहेत.

जकार्ता :  इंडोनेशियामधील इले लेवोटोलोक ज्वालामुखी जागृत होऊन गरम राखेचे ढग निर्माण झाले आहेत. यामुळे परिसरातील हजारो लोक सुरक्षितस्थळी निघून गेले आहेत. ज्वालामुखीतून विषारी वायू आणि लाव्हा बाहेर पडण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

जगभरात दरवर्षी सर्वसाधारणपणे 60 ज्वालामुखींचा उद्रेक होतो. यातील काही ज्वालामुखी जागृत , तर काहींचा उद्रेक हा अचानकच होतो. जागृत ज्वालामुखी म्हणजे ज्यातून उद्रेक होतोच, असं नाही. सक्रिय असणारे आणि पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता असणारे ज्वालामुखींना जागृत ज्वालामुखी म्हटले जातं.

अधिक वाचा :

दहशतवादी संघटना बोको हरामकडून नायजेरियात ४० शेतकऱ्यांची हत्या

दक्षिण कोरियात कोरोनाची तिसरी लाट ; निर्बंध आणखी कडक होणार

इराणने इस्राईलवर हल्ला करावा ; इराणमधील वृत्तपत्राची सरकारला चिथावणी 

संबंधित बातम्या