Seafood: कतार सरकारचा मोठा निर्णय, भारतातून सीफूड निर्यातीचा मार्ग मोकळा

कतारने भारतातून होणाऱ्या सीफूडच्या आयातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
Seafood
SeafoodDainik Gomantak

कतार आयातीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कतारने भारतातून होणाऱ्या सीफूडच्या आयातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता भारतातून कतारतला सीफूड निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम आशियाई देशांबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध सुधारण्यास मदत होणार आहे. 

सीफूडच्या (Seafood) आयातीच्या संदर्भात कतारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतातून (India) गोठवलेल्या सीफूडच्या आयातीवर घातलेली तात्पुरती बंदी कतारने उठवली आहे. यामुळे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये, फिफा विश्वचषकापूर्वी भारतातून पाठवण्यात आलेल्या काही मालात व्हिब्रिओ कॉलरा विषाणू आढळून आला होता. त्यानंतर सीफूडच्या आयातीवर कतारने बंदी घातली होती.

फुटबॉल स्पर्धेच्या धावपळीत त्यांच्या देशात पुरेशा चाचणी प्रयोगशाळांच्या अभावामुळे ही तात्पुरती बंदी घातली असल्याचे कतारच्या अधिकाऱ्यांनी भारताला कळवलं होतं. दरम्यान, आता पुन्हा भारतातून कतारमध्ये सीफूडच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Seafood
Cheetah Project: भारतीय वायूसेनेने दक्षिण आफ्रिकेतून आणले 12 चित्ते

निर्यातीचा मार्ग मोकळा

सीफूडच्या निर्यातीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कतारमधील भारतीय दूतावासासह भारत सरकारचा वाणिज्य मंत्रालयाच्या विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात होते. कतारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी भारतातून गोठवलेल्या सीफूड आयातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सीफूडची निर्यात करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात पश्चिम आशियाई देशात सुमारे 90 कोटी रुपयांच्या सीफूडची निर्यात झाली. यामध्ये झिंग्याची निर्यात सर्वात जास्त झाली आहे. चीनने 99 भारतीय सीफूड प्रक्रिया आणि निर्यात युनिट्सवरील शिपमेंटचे निलंबन देखील उठवले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील सीफूड निर्यात 8 अब्ज ओलांडण्याची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com