विरोधी पक्षनेत्याच्या मारली कानाखाली; हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवरील लाईव्ह शोमध्ये वादविवाद झाला होता, परंतु नंतर सत्ताधारी नेत्याला राग आला आणि त्यांनी थेट लाइव्ह शोमध्येच विरोधी पक्षनेत्याच्या कानाखालीच मारली.

जगभरातील वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान पॅनेलवाल्यांमध्ये जोरदार वादविवाद होणे ही सामान्य बाब बनली आहे, परंतु पाकिस्तानमध्ये जे काही घडते ते काही वेगळच होतं. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवरील लाईव्ह शोमध्ये वादविवाद झाला होता, परंतु नंतर सत्ताधारी नेत्याला राग आला आणि त्यांनी थेट लाइव्ह शोमध्येच विरोधी पक्षनेत्याच्या कानाखालीच मारली. टीव्ही चर्चे दरम्यान झालेल्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. खुद्द पाकिस्तानची जनता यावर टीका करीत आहे.

विरोधी पक्षनेत्याच्या कानाखालीच मारली

पाकिस्तानमधील एका खासगी वाहिनीवर राजकीय विषयावर चर्चा सुरू होती. त्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. चर्चेदरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष सहाय्यक डॉ. फिरदौस आशिक अवान हे विरोधी पीपीपीचे एमएनए खासदार कादिर मंडोखेल यांच्याशी भांडण झाले. या दोघांमधील वाद इतका वाढला की डॉ. फिरदौस यांनी कादिरला केवळ शिव्याच दिल्या नाही तर त्याला मारहाणही केली. या वादाची ही व्हिडिओ क्लिप काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

'क्वाड' देशांकडून अग्नेय आशियातील देशांना एक अब्ज लसींचा पुरवठा

भ्रष्टाचाराच्या मुद्दयाहून सुरू झाली चर्चा

भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद होत होताआणि या दरम्यान कादिर यांनी पक्षावर आणि फिरदोसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. या वादातून फिरदोस यांना राग अनावर झाला. सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये इम्रान खान यांची पार्टी पीटीआयचे नेते डॉ. फिरदौस हे विरोधी पक्षनेते मंदोखेल यांना शिव्या देताना आणि काही क्षणानंतर त्यांच्या गालावर मारताना दिसत आहेत. तिथे ही बाब इतकी बिकट झाली की स्टुडिओत उपस्थित लोकांनी त्या दोघांनाही पकडले आणि वेगळे केले. जावेद चौधरी यांच्या शोच्या रेकॉर्डिंग दरम्यान ही घटना घडली.

भारतीय वंशाच्या व्यक्तींना अमेरिकेत मिळते दुय्यम दर्जाची वागणूक

लोकांनी घेतला आनंद
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फिरदोस आशिक अवान यांनी अद्याप त्या घटनेवर प्रतिक्रिया दिली नाही. त्याच वेळी, लोक या घटनेबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की, उत्तम प्रदर्शन! दोघांतही कोणीच कमी नाही. एक डॉक्टर आहे तर दुसरा पीएचडीधारक आहे. तर दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, 'हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे.'
 

संबंधित बातम्या