इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह; चीनी लसीचा घेतला डोस

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

18 मार्चला इम्रान खान यांनी चिनी कोरोना प्रतिबंधक लस ‘सिनोफार्म’ चा डोस घेतला होता.

इस्लामाबाद: (Imran Khan Corona Positive Dosage taken of Chinese vaccine) जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय बनत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक फैजल सुलतान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान इम्रान खान काही दिवसांपूर्वीच चीनी कोरोना लसीचा डोस घेतला होता. (Imran Khan Corona Positive Dosage taken of Chinese vaccine)

18 मार्चला इम्रान खान यांनी चिनी कोरोना प्रतिबंधक लस ‘सिनोफार्म’ लसीचा डोस घेतला होता. पाकिस्तानात फक्त हीच कोरोनाची लस उपलब्ध आहे. या लसीचे दोन डोस घेणे पाकिस्तानात अनिवार्य आहे.

 

एएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानला चीनने 1 फेब्रुवारीला चीनने ‘सिनोफार्म’ लसीचे पाच लाख डोस पाठवले होते. यानंतर पाकिस्तानमध्ये  कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली होती. 17 मार्चला चीनकडून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसींचा डोस पाठवल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी लस घेतली होती.

 

संबंधित बातम्या