देशाला संबोधित करतांना इम्रान खान भाषण विसरले व्हिडीओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

आपल्या देशातील पाकिस्तानच्या लोकांना पाकिस्तानचा लॉलीपॉप पकडवणारा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानचा जोक सोशल मीडियावर होतच राहतो. 

इस्लामाबाद: आपल्या देशातील पाकिस्तानच्या लोकांना पाकिस्तानचा लॉलीपॉप पकडवणारा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानचा जोक सोशल मीडियावर होतच राहतो. एकीकडे अनियंत्रित महागाई 'उसैन बोल्ट' सारखी पळत आहे, दुसरीकडे गॅस आणि तेलाच्या किंमतीचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया वापरकर्ते काही ना काही मुद्यावरून सलग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ट्रोल करत राहतात अशातच आता पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे.

तुम्ही अमेरिकेचा आत्मविश्वास वाढविला म्हणत जो बायडन यांनी केले भारतीय वंशाच्या लोकांचे कौतुक 

अलीकडेच पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इम्रान खान आपल्या देशवासियांना संबोधित करताना दिसत आहे. त्याच वेळी ते विरोधकांनाही शिव्या देतांना दिसत आहे, परंतु त्यानंतर जे घडले ते अगदी मजेदार होते, कारण इम्रान खान पुन्हा ‘यह जो सारे…बड़े-बड़े… बड़े-बड़े। क्या हैं यह? जो भी हैं।’ म्हणजेच थेट टीव्हीवर बोलताना ते आपल्या ओळी विसरले आणि आपला मुद्दा पुढे ढकलत कसं तरी आपला मुद्दा मांडतांना सारवासारव केली. 

 

संबंधित बातम्या