इम्रान खान सरकारमुळे इस्लामिक अस्मितेला हानी, विरोधी पक्षाचा आरोप

पीडीएम प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी आम्ही जो पर्यंत इम्रान सरकारला जोपर्यंत सत्तेवरून खेचणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे सांगत
इम्रान खान सरकारमुळे इस्लामिक अस्मितेला हानी, विरोधी पक्षाचा आरोप
Imran Khan government is danger for Islam says Pakistan Democratic MovementDainik Gomantak

पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (Pakistan Democratic Movement) ने इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाच्या इस्लामिक (Islamic) अस्मितेला हानी पोहोचवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच पीडीएमने इम्रान सरकार पाडेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे देखील सांगितले आहे . शनिवारी पेशावरमध्ये सरकारविरोधी रॅलीला संबोधित करताना, पीडीएमचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान म्हणाले की, पीडीएम इस्लामाबादमध्ये (Islamabad) पोहोचल्यानंतर पंतप्रधान खान यांना पळून जाण्याची संधी मिळणार नाही. (Imran Khan government is danger for Islam says Pakistan Democratic Movement)

पीडीएम प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी आम्ही जो पर्यंत इम्रान सरकारला जोपर्यंत सत्तेवरून खेचणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे सांगत सध्याच्या व्यवस्थेमुळे देशाच्या इस्लामिक अस्मितेला तडा गेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतर पीडीएम नेत्यांसमवेत पेशावरमधील रॅलीला संबोधित करताना फजल म्हणाले, "जेव्हा आम्ही इस्लामाबादला पोहोचू, तेव्हा आम्ही रस्ते बंद करू, सरकार नाही." फझल म्हणाले की विरोधी आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मागणी केलेली नाही, परंतु तात्काळ सार्वत्रिक निवडणुका हव्या आहेत, ज्या मुळात देशात 2023 मध्ये होणार आहेत.

2018 च्या सार्वत्रिक निवडणुकांचा संदर्भ देत पीडीएम प्रमुख म्हणाले की लोकांची चोरी केलेली मते त्यांना परत केली पाहिजेत. पुढच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हेराफेरीची व्यवस्था सरकारने केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे . या महिन्याच्या सुरुवातीला पीडीएमने देशव्यापी निदर्शने सुरू करण्यासह सरकारच्या लोकविरोधी उपाय आणि महागाई विरोधात इस्लामाबादकडे लाँग मार्चची घोषणा देखील केली होती.

Imran Khan government is danger  for Islam says Pakistan Democratic Movement
ब्रिटनही आता तालिबानच्या पाठीशी, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे मोठे विधान

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com