इम्रान खान सरकार अडचणीत; विरोधक दाखल करणार अविश्वास प्रस्ताव 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या सीनेटच्या निवडणूकांमध्ये पाकिस्तान पिपल्स पक्षाचे नेते यूसूफ रजा गिलानी यांचा विजय झाला आहे.

इस्लामाबाद : इम्रान खान सरकारला पुन्हा एकदा राजकिय संकटाचा सामना कारावा लागणार आहे.अधीच कोरोना महामारीमुळे देशातील नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत असतानाच आता स्थीर सरकार मिळवण्यासाठी झगडाव लागणार असं दिसत आहे. पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या सीनेटच्या निवडणूकांमध्ये पाकिस्तान पिपल्स पक्षाचे नेते यूसूफ रजा गिलानी यांचा विजय झाला आहे. या निवडणूकीत गिलानी यांना 169 मते मिळाली आहेत. मात्र दुसरीकडे गिलानींचा विजय हा इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या राजकिय चिंता वाढवत आहे. इम्रान खान सरकारमधील जेष्ठ नेते डॉक्टर शेख यांना गिलानी यांनी पराभूत केलं आहे. हा पराभव लक्षात घेता पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकिय अस्थिरता निर्माण होणार असल्याची अशी शक्यता वर्तवली जात आहे.

इम्रान खान सरकारमधील जेष्ठ नेत्य़ाचांच पराभव झाल्याने पाकिस्तान डेमॉक्रॅटीक पक्षाच्या नेत्य़ा मरियम नवाझ य़ांनी इम्रान खान सरकारच्य़ा विरोधात अविश्वास ठराव आणण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानातील 11 विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत इम्रान खान सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र मरियम यांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान बुधवारी सीनेटच्या निवडणूकीत देशाच्या अर्थमंत्र्याचा पराभव झाल्यानंतर संसदेत बहुमत सिध्द करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अ‍ॅमेझॉनला या कारणामुळे बदलावा लागला लोगो; हिटलरच्या मिशांशी केली होती तुलना

गिलानी यांच्या पराभवामुळे इम्रान खान सरकारवर विरोधी पक्षांसह स्वपक्षातील नेत्यांनीही टिका करण्य़ास सुरुवात केली आहे. विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांनी सीनेटच्या निवडणूकीत झालेला पराभव स्वीकारुन राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. सीनेटच्या निकाल आल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पंतप्रधान इम्रान खान सरकार बहुमत सिध्द करणार असल्याची घोषणा केली आहे. पक्षाची बैठक झाल्यानंतर यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या