शरीफ यांच्याकडून बंडाचे षड्‌यंत्र 

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

पाकिस्तानच्या सैनिकांत बंड घडवून आणण्याचे षड्‌यंत्र माजी पंतप्रधान नवाज शरीफ करत असल्याचा आरोप पंतप्रधान इम्रान खान यांनी 
केला आहे. 

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सैनिकांत बंड घडवून आणण्याचे षड्‌यंत्र माजी पंतप्रधान नवाज शरीफ करत असल्याचा आरोप पंतप्रधान इम्रान खान यांनी 
केला आहे. 
 नवाज शरीफ यांचा उल्लेख त्यांनी धूर्त राजकारणी म्हणून केला असून आजाराचे कारण सांगून त्यांनी देशातून पळ काढला, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. 

खैबर पख्तुनवाच्या मिंगोरा येथील सभेत बोलताना पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, की नवाज शरीफ हे लंडनमध्ये एखाद्या कोल्ह्याप्रमाणे लपून बसले आहेत. तेथूनच पाकिस्तानी सैनिकांवर टीका करत आहेत. 
ते पाकिस्तानी सैनिकांत बंड घडवून आणण्याबरोबरच आयएसआय आणि सैन्यप्रमुखाला बदलण्याचे देखील आवाहन करत आहेत. आजाराचे कारण सांगून नवाज शरीफ हे पाकिस्तानबाहेर गेले आहेत. शरीफ यांना केवळ पैसा हवा असून देशाची लूट करुन मोठी माया जमवली, असा आरोप इम्रान खान यांनी केला.

संबंधित बातम्या