इम्रान खान यांना सौदीच्या राजाकडून भेट म्हणून मिळाली तांदळाची पोती

Imran Khan received a bag of rice as a gift from the King of Saudi Arabia
Imran Khan received a bag of rice as a gift from the King of Saudi Arabia

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) तीन दिवसीय दौऱ्यावर होते. नुकतेच ते पाकिस्तानला परतले आहेत. मात्र हा दौरा कोणत्या कारणासाठी आयोजित करण्यात आला होता यावरुन विरोधी पक्षांबरोबरच पाकिस्तानमधील जनता सवाल उपस्थित करत आहेत. सौदी अरेबियाकडून तब्बल 19 हजार 32 तांदळाची पोती पाकिस्तानला (Pakistan) देण्यात आली आहेत. पाकिस्तामधील विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरुन इम्रान सरकारवर निशाणा साधला आहे. हा पाकिस्तानचा अपमान असल्याचं विरोधी पक्षांकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तान पिपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी, जितक्या किंमतीचे तांदूळ पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या देशात आणलेत त्यापेक्षा जास्त पैसा पंतप्रधानांनी आपल्या दौऱ्यावर खर्च केला आहे, असा टोला लगावला आहे. (Imran Khan received a bag of rice as a gift from the King of Saudi Arabia)

पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत सौदी दौऱ्यामध्ये 12 मंत्री आणि सहकारी त्यांच्यासोबत होते. हा दौरा पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा ठरला असल्याचा दावा करण्यात येत आहे. भुट्टो यांनी सौदी अरेबियाकडून दान मिळाल्याच्या वेळेवरुनही काही शंका उपस्थित केली आहे. सौदीने पाकिस्तानला केलेली मदत ही जकातच्या स्वरुपामध्ये दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान मागील 22 वर्षापासून राजकारणाच्या क्षेत्रात आहेत का असा सवालही भुट्टो यांनी उपस्थित केला आहे. रमजानच्या महिन्यामध्ये चांगल्या कामासाठी जो निधी गोळा करण्यात येतो त्याला मुस्लीम धर्मीय लोक जकात म्हणतात. अणवस्त्रसंपन्न असणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशानं अशापध्दतीची मदत घेताना विचार करायला हवं होतं, असही भुट्टो यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षाने टीका केल्यानंतर इम्रान खान सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांनी मात्र बचावात्मक पवित्रा घेतला असल्याचे चित्र दिसत आहे. इम्रान खान यांचे विशेष सल्लागार ताहिर अशरफी यांनी पाकिस्तानने या आगोदर गरीबांसाठी अशाप्रकारची मदत सौदी अरेबियाकडून घेतली असल्याची आठवण करुन दिली. पाकिस्तानला तांदळाची पोती देण्याचा निर्णय सौदी अरेबियाने महन्याभरापूर्वीच घेतला होता. इम्रान यांनी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान (Mohammed Bin Salman) यांची भेट घेतली. दोघांमध्ये देशांमधील संबंध सुधारण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com