पाकिस्तानचे पंतप्रधान सवयीचे गुलाम; आवळला पुन्हा कश्मीरी राग

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

इम्रान खान यांनी अनेक वेळा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केलेल्या भाषणादरम्यान काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या सवयीचे गुलाम आहे. जागतिक मंचांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून ते शांत बसत नाही आहे. आता पुन्हा त्यांना काश्मीरी राग छेडला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी शुक्रवारी ट्विट केले की, "गेल्या सात दशकापासून भारताने काश्मिरमधील जनतेचा आवाज दाबून ठेवला आहे. पण पाकिस्तान काश्मीरमधील जनतेच्या कायम सोबत आहे. आम्ही कश्मीरी जनतेला पूर्ण पाठिंबा देवू."

इम्रान खान यांनी जम्मू-काश्मिरबद्दल अनेकदा ट्विट केले आहेत. ते म्हणाले की, "संयुक्त राष्ट्रांच्या नियमांतर्गत पाकिस्तानला जम्मू-काश्मिरच्या प्रश्नावर तोडगा हवा आहे. पुन्हा एकदा भारताला गीधड धमकी देत इम्रान म्हणाले, की काश्मिरची नवीन पिढी आपले युद्ध लढत आहे आणि पाकिस्तान त्यांच्या पाठीशी आहे. शांततेसाठी पाकिस्तान दोन पावले पुढे टाकण्यास तयार आहे.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इम्रान खान यांनी अनेक वेळा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केलेल्या भाषणादरम्यान काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. जेव्हा जेव्हा कश्मीरी मुद्दा उपस्थित केला तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना तोंडघाशी पडाव लागले आहे. कारण भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की जम्मू-काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे तेव्हा हा भारत चर्चेचा विषय अजिबात नाही.

सेलिब्रेटींच्या ट्विटर वॉरनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया -
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांनाच चकित केले आहे.  अशातच इम्रान खान यांनी हे ट्विट केले आहे. बाजवा यांनी असे म्हटले आहे की, “आता वेळ आली आहे की प्रदेशातील सर्व वाद शांततेच्या मार्गाने सोडवले जावे जेणेकरून मैत्रीचा हात पुढे करता येवू शकेल.”

संबंधित बातम्या