भारतासोबत चर्चा करण्यासाठी इम्रान खान यांनी ठेवली अट; जाणून घ्या
emran &modi.jpg

भारतासोबत चर्चा करण्यासाठी इम्रान खान यांनी ठेवली अट; जाणून घ्या

जगभरात कोरोनाचं संकट(covid19) असताना भारताशी (india) चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे (pakistan) पंतप्रधान इम्रान खान यांनी (Imran Khan) एक अट घातली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील प्रसिध्द उर्दू वृत्तपत्राला (Urdu newspaper) दिलेली मुलाखत आणि विरोधी पक्षांबरोबर असलेला वाद सध्या चांगलाच चर्चेला जात आहे. इम्रान खान यांनी पुन्हा नव्याने भारताला चर्चा करण्याची ऑफर दिली आहे. काश्मीर (Kashmir) खोऱ्यातील परिस्थिती पूर्वस्थितीत आणण्यासाठी जर भारत रोडमॅप देत असेल तर पाकिस्तान भारताशी चर्चा करण्यासाठी तयार असेल, असं इम्रान खान म्हणाले. अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची नक्की मागणी काय आहे? या सगळ्या परिस्थितीवर भारताचा काय आक्षेप आहे? जाणून घेऊया.. (Imran Khans condition for talks with India Find out)

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ठेवली जुनीच अट
भारताशी चर्चा करण्यासाठी इम्रान खान यांनी  जुनीच अट ठेवली आहे. खान म्हणाले, भारत काश्मीर खोऱ्यातील जुनी परिस्थिती पूर्वस्थितीत आणण्यासाठी तयार असेल तर पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेसाठी तयार असणार आहे. जम्मू-काश्मीर (jammu and Kashmir) राज्याला असणारा विशेष दर्जा रद्द करुन भारताने रेड लाईन ओलांडली आहे. पण भारत काश्मीरसंबंधी रोडमॅप देत असेल पाकिस्तान चर्चेसाठी असेल. 

पुढे बोलताना खान म्हणाले, ऑगस्ट 2019 मध्ये घेतलेला निर्णय रद्द करण्यासाठी आता कोणती पावले उचलली जातील हे स्पष्टपणे भारताने सांगणे आवश्यक आहे. दोन्ही देशादरम्यान पुन्हा नव्याने द्विपक्षीय चर्चा व्हावी यासाठी पाकिस्तान तयार असेल. 

भारताने काश्मीरसंबंधी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करत इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे म्हटले. तर दुसरीकडे काश्मीरचा प्रश्न हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणत भारताने पाकिस्तानचा युक्तीवाद नाकारला आहे. जगातील कोणत्याही देशाला या प्रश्नासंबंधी हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असं भारताकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे.   

कलम 370 रद्द करण्याचा रोडमॅप भारतानं द्यावा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, भारताने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. या घटनात्मक दुरुस्तीमुळे जम्मू-काश्मीर राज्याचे रुपांतर दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आले. जोपर्यंत जम्मू-काश्मीर राज्याला भारत पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा बहाल करत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय चर्चा होऊ शकत नाही. 

मुलाखती दरम्यान खान पुढे म्हणाले, ''भारताशी आम्ही नेहमीच आपले द्विपक्षीय संबंध मन मोकळेपणाने ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला भारतीय उपखंडात असणारे दारिद्र कमी करायचे असेल तर दोन्ही देशांनी एकमेकांशी व्यापारी संबंध वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. 

मुलाखती दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध नव्याने विकसित करण्यासाठी खान यांनी युरोपियन युनियनचे उदाहरण यावेळी दिले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com