पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींना पत्र

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

मागील महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या शक्यता अजून वाढल्या आहेत.

 

दिल्ली: मागील महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या शक्यता अजून वाढल्या आहेत. या भागात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दिनाच्या अभिनंदन संदेशाला प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान वादासह सर्व थकित प्रश्न सोडविण्यासाठी दक्षिण आशियात कायमस्वरुपी शांतता व स्थिरता आवश्यक असल्याचे त्यांनी लिहिले आहे. पाकिस्तानच्या माध्यमांमधून ही गोष्ट समोर आली आहे.(Imran Khan's letter to Prime Minister Narendra Modi)

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी भारतावर साधला निशाणा

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहून पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाचे (23 मार्च) अभिनंदन केले होते.  तसेच दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची सुद्धा इच्छा व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयालाकडे सुपूर्द केले  होते.  या पत्रात नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना लिहिले की,"पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मी पाकिस्तानच्या जनतेला माझ्या शुभेच्छा देतो. एक शेजारी देश म्हणून, पाकिस्तानच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याची भारताची इच्छा आहे. यासाठी दहशतवादापासून व आक्रमकते पासून मुक्त वातावरण  आणि विश्वासअत्यंत महत्वाचे आहे. तसेच संबंध मानवजातीसाठी कठीण असलेल्या या कोरोना काळाशी लढण्यासाठी मी आपल्याला आणि पाकिस्तानच्या जनतेला शुभेच्छा देतो."

भारत (India) आणि पाकिस्तानने (Pakistan)  गेल्या महिन्यातच नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी अंतर्गत चर्चा सुरु असल्याचे समजते आहे. अलीकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित झाले तर ती नवी दिल्लीला (Delhi)  संसाधनांनी भरलेल्या मध्य आशियात पोहोचण्यास मदत होईल. "2018 मध्ये सत्तेत आल्यानंतर आमच्या सरकारने भारताशी संबंध सुधारण्यासाठी बरीच पावले उचलली, परंतु नवी दिल्लीकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही", असा दावा सुद्धा इम्रान खान यांनी यावेळी केला आहे. 

संबंधित बातम्या