कापूस आणि साखर आयातीच्या निर्णयावरून इम्रान खान यांचा यूटर्न 

कापूस आणि साखर आयातीच्या निर्णयावरून इम्रान खान यांचा यूटर्न 
imran khan 1.jpg

भारताशी मर्यादित व्यापार सुरू करण्याच्या हालचालीवरून पाकिस्तानने गुरुवारी यू टर्न घेतला आहे. देशांतर्गत विरोधापुढे झुकत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडून कापूस व सुती धागा आयात करण्याची परवानगी देण्याच्या सरकारी पॅनेलच्या निर्णयावरुण यू-टर्न घेतला आहे. पाकिस्तानातील आर्थिक समन्वय समितीने  भारताकडून कापड  उद्योग आणि कापूस आयतीचा घेतलेल्या निर्णय रद्द केला आहे. जोपर्यंत भारत जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करत  नाही, तोपर्यंत भारतातून साखर आणि कापसाच्या आयातीवर बंदी घालण्यात येईल. अशी माहिती पाकिस्तानचे कॅबिनेट मंत्री शेख रशीद यांनी दिली आहे. 

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील आर्थिक समन्वय समितीने बुधवारी भारताशी व्यापार पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. या समितीने 30 जून 2021 पासून पाकिस्तानकडून कापूस आयात करण्याची मागणी केली होती. पाकिस्तान सरकारनेही खासगी क्षेत्राला भारत कडून साखर आयात करण्यास मान्यता दिली होती. मात्र गुरुवारी पाकिस्तान मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये कापूस आयातीवरील निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे एकीकडे कापड उद्योग भारताकडून कापूस मिळावा अशी मागणी करत आहेत, तर दुसरीकडे काश्मीरमध्ये बदल न करता इम्रान सरकारने भारतापुढे मान झुकवल्याबद्दल  कट्टरतावादी टीका करत आहेत. 

सन 2016 मध्ये पाकिस्तानने भारताकडून कापूस व इतर कृषी उत्पादनांची आयात थांबविली होती. पाकिस्तानमधील साखरेच्या वाढत्या किंमती आणि इतर संकटांपासून कापड उद्योगल वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने भारताबरोबर व्यापार पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली होती. दोन्ही देशांमधील ताणतणावाच्या संबंधांदरम्यान, हे भारताशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पाकिस्तानचे पहिले मोठे प्रयत्न म्हणून पाहिले जात होते. 

याच शिवाय कापसाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी वस्त्रोद्योग तीव्र संकटातून जात आहे. पाकिस्तानच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कच्च्या मालाचा तुटवडा दूर करण्यासाठी कापूस आयातीवरील बंदी भारतकडून हटविण्याची शिफारस केली होती. या दबावाखाली इम्रान खान सरकारने सर्वात आधी कापसाच्या आयातीला मान्यता दिली,  पण जेव्हा राजकीय पक्षांच्या दाबावापुढे त्यांनी पुनः या आयातीच्या  निर्णयाला स्थगिती दिली. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com