Pakistan: 'मला अटक केल्यास...,' इम्रान खान यांचा शाहबाज सरकारला इशारा

पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सध्याच्या शाहबाज सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Pakistan: 'मला अटक केल्यास...,' इम्रान खान यांचा शाहबाज सरकारला इशारा
Imran KhanDainik Gomantak

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सध्याच्या शाहबाज सरकारवर हल्लाबोल केला आहे. मला अटक केल्यास प्रकरण उलटू शकते, असा इशारा इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारला दिला आहे. डेली टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एका रॅलीत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, 'पाकिस्तानच्या संसदेत गुन्हेगार बसले आहेत. आमचा पक्ष म्हणजेच पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( PTI) ला मुदतपूर्व निवडणुका हव्या आहेत.' (Imran Khan's warning to Prime Minister Shahbaz If I am arrested it will be difficult)

इम्रान यांचा पंतप्रधान शाहबाज यांना इशारा

शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी आपल्याला अटक करण्याची योजना आखल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला असून, त्यांच्यावर देशात गृहयुद्ध भडकवण्याचा आणि राष्ट्रीय संस्थांबद्दल खोट्या कथा रचल्याचा आरोप केला आहे.

Imran Khan
Pakistan: 'धक्कादायक' अज्ञातांनी मृत मुलीवर केला बलात्कार, 17 आरोपींची चौकशी सुरु

रविवारी अबोटाबादच्या जाहीर सभेला संबोधित करताना इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, '20 मार्च रोजी लाँग मार्च काढण्यापासून कोणतीही शक्ती मला रोखू शकत नाही.' एआरवाय न्यूजनुसार, इम्रान खान यांनी इशारा दिला आहे की, 'सध्याच्या सरकारच्या विरोधात 20 लाख लोक लाँग मार्चद्वारे इस्लामाबादमध्ये पोहोचणार आहेत.' इम्रान पुढे म्हणाले की, 'लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांना सहभागी करुन घेणे आणि त्यांना सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी होण्यास सांगणे हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे.'

Imran Khan
Pakistan: शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात हिना रब्बानी खार बनल्या परराष्ट्र राज्यमंत्री

यावेळी इम्रान खान यांनी पंतप्रधान शरीफ यांना भिकारी, भित्रा आणि दरोडेखोर असेही संबोधले. देश कोणत्याही स्थितीत अमेरिकेची गुलामी स्वीकारणार नाही, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.