हाँगकाँगमधील सार्वजनिक शाळांमध्ये चीनी ध्वज फडकावणे आता बंधनकारक !

हाँगकाँगमधील (Hong Kong) नवीन कायद्यानुसार आता खासगी शाळांमध्ये चीनचा ध्वज फडकवणे, राष्ट्रगीत गायन करणे बंधनकारक (Hong Kong Anthem Law) करण्यात आले आहे.
हाँगकाँगमधील सार्वजनिक शाळांमध्ये चीनी ध्वज फडकावणे आता बंधनकारक !
China FlagDainik Gomantak

हाँगकाँगमधील (Hong Kong) नवीन कायद्यानुसार आता खासगी शाळांमध्ये चीनचा (China) ध्वज फडकवणे, राष्ट्रगीत गायन करणे बंधनकारक (Hong Kong Anthem Law) करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी या कायद्याला दडपशाही करणारा कायदा म्हटले आहे. तसेच याद्वारे मुलांमध्ये चीनबद्दलची ओढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या व्हॉईस ऑफ अमेरिका (VOA) ने सरकारी विधानाचा हवाला देत म्हटले आहे की, या नवीन धोरणाचा उद्देश राष्ट्रीय शिक्षणाला (National Education) प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना विकसित करणे हा आहे. राष्ट्रगीताशी संबंधित नियमांद्वारे विद्यार्थ्यांची चिनी लोकांबद्दलची ओढ आणि राष्ट्रभावना वाढेल, असे निवेदनात म्हटले आहे.

हाँगकाँगमध्ये पुढील वर्षापासून, सर्व खाजगी किंडरगार्डन, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी प्रत्येक शाळेच्या दिवशी राष्ट्रध्वज प्रदर्शित करणे आणि आठवड्यातून एकदा राष्ट्रगीत गायनासह ध्वजारोहण समारंभ आयोजित करणे आवश्यक असेल (China in Hong Kong). या वर्षी जूनमध्ये राष्ट्रगीत अध्यादेश लागू झाल्यानंतर हा अध्यादेश नव्याने जाहीर करण्यात आला. या नवीन नियमानुसार राष्ट्रगीत किंवा ध्वजाचा 'अपमान' करणारी कोणतीही कृती गुन्हा मानली जाणार असून असे करणाऱ्या व्यक्तीला शिक्षाही देण्यात येणार आहे. याद्वारे चीनच्या अत्याचाराला विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा आणि पकड मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

China Flag
चीन अमेरिकेतील तणाव आणखीन वाढणार? ट्रम्प,बायडन यांची सारखीच रणनीती

विद्यार्थी आणि शिक्षक आंदोलन करत आहेत

या नव्या धोरणाला विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही विरोध करत आहेत. ते म्हणतात की, आम्ही फक्त उभा राहणार मात्र राष्ट्रगीत (Hong Kong Anthem Law) गाणार नाही. एका शिक्षकाने सांगितले, 'राष्ट्रगीत गाणे इतके महत्त्वाचे नाही, ती केवळ परंपरा आहे. राष्ट्रगीत गाऊन विद्यार्थी चीन समर्थक होतील असे वाटते का? 'हे धोरण... आम्हाला (विद्यार्थ्यांना) चिनी राष्ट्रात चिनी नागरिक बनवण्याच्या प्रयत्नाची सुरुवात आहे.'

चीन सोव्हिएत युनियनप्रमाणे वागतो

क्युरी म्हणाले, 'दुसर्‍या महायुद्धानंतर (Second World War) पूर्व युरोपमध्ये जे घडले त्याच्याशी ते बरेच साम्य आहे. मग सोव्हिएत युनियनने (Soviet Union) ज्या देशांवर कब्जा केला होता, तेथील तरुणांनी त्यांना कम्युनिस्ट बनवायला सुरुवात केली. ज्याची सुरुवात मुलांना ध्वज आणि राष्ट्रगीत स्वीकारण्यास सांगण्यासारख्या गोष्टींपासून होते. यानंतर मार्क्सवाद, लेनिनवाद, माओवाद यांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com