कोरोना लसीकरणात भारत अमेरिकेच्या पुढे

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढ लक्षात घेता लसीकरणाच्या प्रक्रिया देखील वेगात सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 8.70 कोटी लोकांना कोरोना लस दिली गेली आहे. 

कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढ लक्षात घेता लसीकरणाच्या प्रक्रिया देखील वेगात सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 8.70 कोटी  लोकांना कोरोना लस दिली गेली आहे.  त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असले तर, लसीकरणाच्या वेगाच्या बाबतीतही भारताने अमेरिकेला मागे सोडले आहे. गेल्या 24 तासांच्या आकडेवारीनुसार, लडाखमधील 33 लाख लोकांना लास देण्यात आली आहे.(India ahead of US in corona vaccination)

सरकारने सामायिक केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 89,63,724 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर लसीचे दोन्ही डोस घेणार्‍या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या 53,94913 वर पोहोचली आहे. साथीच्या रोगाचा सामना करणाऱ्यात अग्रभागी असणाऱ्या कोरोना  97,312826 योध्यांना आता पर्यंत लसीच्या पहिल्या डोस देण्यात आला आहे. तर दोन्ही डोस कोरोना योध्यांची संख्या 4312826 पर्यंत पोहोचली आहे. तसेच, आतापर्यंत 45-59 वयोगटातील 21860709 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर दोन्ही डोस घेणार्‍यांची संख्या 431933 पर्यंत आहे. विशेतः  60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 5375953 लोकांना लसीचा पहिला देण्यात देण्यात आला आहे तर 1000787 दुसरा डोस देखील देण्यात आला आहे. 

कोरोनामुळे गंभीर परिस्थिती झालेल्या 11 राज्यांची यादी; केंद्रीय आरोग्य...

दरम्यान, गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा भारतात (India) एक लाखाहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. 24 तासांत एकूण 115736 नवीन प्रकरणे नोंदली गेल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळसह केवळ आठ राज्यांमधून देशातील 80 टक्क्यांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक 55469 कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत. तर छत्तीसगडमध्ये 9921 आणि कर्नाटकात 6150 रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या