तणाव कमी करण्यावर भर

पीटीआय
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

भारत-चीन यांच्यात सहाव्या फेरीत चौदा तास मॅराथॉन चर्चा 

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील तणाव कमी व्हावा म्हणून भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱ्यांत सोमवारी चौदा तासांहून अधिक काळ मॅराथॉन बैठक झाली. उभय देशांच्या अधिकाऱ्यांनी आणखी एक बैठक घ्यायचे ठरविले. संघर्षाच्या ठिकाणावरून चीनने तात्काळ माघार घ्यावी.  तणाव कमी करण्यासाठी चीनने पहिले पाऊल उचलणे आवश्‍यक आहे, असेही भारताने या वेळी बजावले. बैठकीची सहावी फेरी पूर्व भारताच्या चुशूल सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेच्या पलिकडे चीनकडील भागात मोल्डो येथे सोमवारी सकाळी ९ वाजता सुरू झाली आणि ती रात्री ११ वाजता संपली. 

भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह येथील १४ व्या कोअरचे कमांडर लेप्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले. बैठकीत प्रथमच परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देखील सहभागी झाला होते. परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव,  याशिवाय लेप्टनंट जनरल पी. जी. के मेनन देखील सहभागी झाले होते.

पंचसूत्री अंमलाबाबत चर्चा
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी मॉस्को येथे दोन्ही देशांच्या पररराष्ट्रमंत्र्यांनी ठरवलेल्या पंचसूत्री द्विपक्षीय कराराच्या अंमलबजावणीबाबत सविस्तरपणे झाली. सहाव्या फेरीच्या बैठकीचे अजेंडा देखील पंचसूत्री कराराच्या अंमलबजावणीचा होता. 
 

संबंधित बातम्या